जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला फेव्हरेट खेळाडू IPL खेळणार नाही

प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला फेव्हरेट खेळाडू IPL खेळणार नाही

प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला फेव्हरेट खेळाडू IPL खेळणार नाही

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र आयपीएललाही आता दुखापतींचे ग्रहण लागले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंजाब, 13 फेब्रुवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान चाहत्यांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र या स्पर्धेआधीच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मोठा झटका बसला आहे. हाताला दुखापत झाल्यामुळं ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे. मॅक्सवेलच्या डाव्या हाताच्या कोपरात दुखापत झाली आहे. यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही सामिल होणार नाही आहे. मॅक्सेवेलच्या त्याच्या जागी डार्सी शॉर्टला संघात समावेश करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 3 टी -20 आणि तत्सम एकदिवसीय सामने दोन्ही देशांमध्ये खेळले जाणार आहेत. पहिला टी 20 21 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळला जाईल. वाचा- लग्नाच्या 7 वर्षानंतर क्रिकेटपटूचा घटस्फोट, पत्नीला द्यावे लागणार 192 कोटी गुरुवारी मॅक्सवेलवर शस्त्रक्रिया होणार आहेत. या सामन्यात पूर्णपणे फिट होण्यासाठी त्यांना 6 ते 8 आठवडे लागू शकतात. याचा अर्थ असा की 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलचा सलामीचा सामना ते खेळू शकणार नाहीत. लिलावात पंजाबने त्याला 10.75 कोटींमध्ये खरेदी केले. मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौर्‍याबाहेर गेल्यानंतर, या दौर्‍यामधून माघार घेणे मला सोपे नव्हते. सध्याच्या कोपर दुखापतीमुळे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो यावर माझा विश्वास नव्हता. म्हणून मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. “, असे सांगितले होते. याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्यामुळं क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. वाचा- IPL आधी कोहलीला मोठा धक्का, RCBचे सर्व अकाउंट झाले बंद? दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या लिलावात मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी प्रिती झिंटाने झटापट केली होती. मात्र आता 10.75 कोटींना विकत घेतलेला खेळाडू खेळू शकणार नाही आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या तेराव्या हंगामाचा कर्णधार केएल राहुल असणार आहे. आर. अश्विनला रिलीज केल्यानंतर अनिल कुंबळेने राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली. किंग्ज इलेव्हन संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. वाचा- हार्दिक पांड्या 6 महिन्यानंतर करणार कमबॅक! ‘या’ संघाविरद्ध उतरणार मैदानात जोफ्रा आर्चरही खेळणार नाही IPL नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका इंग्लंड दौर्‍यादरम्यान आर्चरला दुखापत झाली. आता तपासणीत असे दिसून आले आहे की उजव्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर आहे, यामुळे तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर तो दुसऱ्या आणि तिसर्‍या कसोटीत खेळला नाही, त्यानंतर चौथ्या कसोटीसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेहून इंग्लंडला परतल्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन झाले, त्यानंतर त्याला तीन महिन्यांसाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020
  • First Published :
जाहिरात
जाहिरात