Home /News /sport /

लग्नाच्या 7 वर्षानंतर एका अफेअरमुळे तुटला क्रिकेटपटूचा संसार! पत्नीला द्यावे लागणार 192 कोटी

लग्नाच्या 7 वर्षानंतर एका अफेअरमुळे तुटला क्रिकेटपटूचा संसार! पत्नीला द्यावे लागणार 192 कोटी

लग्नाच्या सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    सिडनी, 13 फेब्रुवारी : क्रिकेटपटूंचे मैदानावरील खेळीकडे जसे चाहत्यांचे लक्ष असते तसेच, त्यांच्या मैदानाबाहेरील आयुष्यही तेवढेच चर्चेत असते. त्यामुळं खेळाडूंचे अफेअर, प्रेम आणि घटस्फोट हे सगळ्यात चाहत्यांना रस असतो. अशाच एका दिग्गज क्रिकेटपटूच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला 2015मध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन करणारा कर्णधार मायकल क्लार्कचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियान मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार मायकल क्लार्कने पत्नी कायलीशी घटस्फोट घेतला आहे. क्लार्कने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजारा दिला. सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. एवढेच नाही तर 5 महिन्यांपासून दोघे वेगळेही राहत होते. वाचा-IPL आधी कोहलीला मोठा धक्का, RCBचे सर्व अकाउंट झाले बंद? वाचा-हार्दिक पांड्या 6 महिन्यानंतर करणार कमबॅक! ‘या’ संघाविरद्ध उतरणार मैदानात क्लार्कला द्यावी लागणार 192 कोटी पोडगी मायकल क्लार्कने (Michael Clarke Divorce) घटस्फोटाबाबत, “गेल्या काही महिन्यांपासून आमच्यात वाद होते. त्यामुळं दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या आनंदाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे”, असे सांगितले. दरम्यान ऑस्ट्रेलियान मीडियामध्ये सध्या क्लार्कला घटस्फोटानंतर पोडगी म्हणून पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत, अशी चर्चा आहे. वाचा-संघात मिळालं नाही स्थान, 23 वर्षीय खेळाडूने सोडलं क्रिकेट! अफेअरमुळे झाला घटस्फोट? 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये, मायकल क्लार्कचे आपल्या सहाय्यकासोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. साशा क्रिकेट अकादमीचे काम सांभाळायची. याच दरम्यान, क्लार्क आणि त्यांची सहाय्यक साशाची काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले हहोते. चित्रांमधून दोघांमध्ये बरीच जवळीक होती. अशा परिस्थितीत क्लार्कने या प्रकरणामुळे आपली पत्नी कायलीशी घटस्फोट घेतल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचा-फलंदाज बोल्ड झाल्यानंतरही पंचांनी ठरवलं नाबाद! गोलंदाज म्हणाला, ऐकू आलं नाही का? मायकल क्लार्कची कारकीर्द मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी निवृत्ती घेतलेल्या क्लार्कने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवले होते. क्लार्कने 245 एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने 7981 धावा केल्या. त्याने 115 कसोटीत 49.10 च्या सरासरीने 8643 धावा केल्या. टी -20 मधील त्याची कामगिरी नक्कीच विशेष नव्हती. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून 34 टी -20 सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या