‘आता IPLवर माझं करिअर नाहीतर...’, भारताच्या अव्वल फिरकीपटूने व्यक्त केली भीती

‘आता IPLवर माझं करिअर नाहीतर...’, भारताच्या अव्वल फिरकीपटूने व्यक्त केली भीती

भारतीय क्रिकेट संघ सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत असले तरी, सध्या लक्ष आहे ते टी-20 वर्ल्ड कपवर. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 मार्च : भारतीय क्रिकेट संघ सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत असले तरी, सध्या लक्ष आहे ते टी-20 वर्ल्ड कपवर. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळं संघात जागा मिळवण्यासाठी सर्व खेळाडूं आयपीएलमध्ये संधी मिळणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यामुळं खेळाडूंसाठी वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवण्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. याबाबतच भारताच्या फिरकीपटूने चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय लेगस्पिनर कुलदीप यादवला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टी -20 विश्वचषक संघात स्थान मिळवायचे आहे. एक वर्षापूर्वी, कुलदीप हा परदेशी भूमीवरील भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज होता, परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म खराब झाला आणि त्याला संघात स्थान मिळाले नाही.

वाचा-14 महिन्यात असा बदलला भारतीय महिला क्रिकेट संघ! ‘हा’ व्यक्ती ठरला गेमचेंजर

भारतीय संघात सध्या कुलदीप आणि युजवेंद्र चहल असे दोन फिरकीपटू आहेत, परंतु रविंद्र जडेजाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यापासून दोघांनीही कमी संधी मिळत आहेत. याबाबत कुलदीपने नुकतीच भिती व्यक्त केली. एका मुलाखती दरम्यान कुलदीपने, “कोणाला संघात खेळवायचे हे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. आमचा संघ खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू”, असे सांगितले.

वाचा-VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कमबॅक करण्यासाठी सज्ज

कुलदीप पुढे म्हणाला की, “जडेजा फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून चांगली कामगिरी करत आहे. त्यांच्यामुळं संघाला फायदा होतो. परंतु जेव्हा जेव्हा मला आणि चहलला संधी मिळते तेव्हा आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो”. दरम्यान आता, 12 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत एकदिवसीय मालिका खेळणार आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या या मालिकेत कुलदीपला भारतीय संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आयपीएल आहे, तिथे कुलदीपला चांगली कामगिरी करायला आवडेल, जेणेकरुन टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकेल. याबाबत विचारले असता कुलदीपने, “आयपीएल हे एक व्यासपीठ आहे जिथे आपल्याला नेहमी सतर्क राहावे लागेल. आता मी या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. आता माझे सर्व लक्ष त्याकडे लागले आहे”, असे सांगितले. आयपीएलच्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा यंदा 50 दिवस चालणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून कुलदीप खेळत असून, या हंगामात चांगली कामगिरी करण्यास तो सज्ज आहे.

वाचा-आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन

First published: March 6, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या