जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती

IPL 2020 : कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती

मात्र या यादीमध्ये चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत केवळ 4 वेळा शतक लगावता आले आहे. तर कोलाकाता नाईट रायडर्सकडून मॅक्युलमने एकमेव शतक लगावले आहे.

मात्र या यादीमध्ये चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत केवळ 4 वेळा शतक लगावता आले आहे. तर कोलाकाता नाईट रायडर्सकडून मॅक्युलमने एकमेव शतक लगावले आहे.

कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दहशत जगभरात परसली आहे. आता याचा थेट परिणाम खेळांवरही होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दहशत जगभरात परसली आहे. भारतातही कोरोनाव्हायरसचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. राजस्थानच्या जयपूरमधील पर्यटकाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या सर्व रुग्णावर उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोनामुळं जगातील अर्थव्यवस्था ढासळली असताना, त्याचा फटका खेळांनाही बसला आहे. जगातील अनेक स्पर्धा कोरोनामुळं रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका आता जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग इंडियान प्रीमिअर लीगलाही (IPL) बसणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. पहिलाच सामना मुंबईत होणार असून इतर सामना चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद अशा शहरांमध्येही होणार आहे. कोरोनामुळं आयपीएल स्पर्धा रद्द होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असताना, बीसीसीआयनं याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे. वाचा- IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांचे होणार नुकसान बीसीसीआयचे सदस्य आणि आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी, कोरोनाचा आयपीएलला काहीही धोका नसल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वात महागड्या अशा टी -20 क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे मत ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केले आहे. सद्य परिस्थितीत कोरोना विषाणूमुळे कोणत्याही खेळाडूला कोणताही धोका नाही, असेही सांगितले. वाचा- 16 व्या वर्षी फक्त 18 सामने खेळून झाली नंबर वन, दिग्गजही पडले मागे मुंबईत होणार पहिला सामना आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. पहिला सामना हा गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा 50 दिवस चालणार असून देशातील विविध उपनगरांमध्ये हे सामने होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी होणार आहे. वाचा- फॉर्ममध्ये नाही म्हणून क्रिकेटमधून घेतला ब्रेक, आता कम बॅक करताना रचला इतिहास IPLला धोका नाही मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ब्रिजेश यांना आयपीएलला कोरोना विषाणूचा धोका आहे का? असे विचारले असता त्यांनी, “आतापर्यंत कोणताही धोका नाही आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवतो”. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की भारतात अद्याप याचा धोका नाही आहे. तर, बोर्डाच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या वेळापत्रकानुसार भारतात येणार आहे. विशेष म्हणजे इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यापूर्वी म्हणाला होता की तो कोणत्याही खेळाडूशी हातमिळवणी करणार नाही, कारण हातमिळवणी करून कोरोना विषाणूचा प्रसार देखील होतो. यामुळेच खेळाडूंमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. माकत्र आयपीएलचे सामने ठरल्या वेळेप्रमाणे होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात