नवी दिल्ली, 06 मार्च : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket Team) टी -20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत-इंग्लड यांच्यातील सेमीफायनलचा सामना पावसामुळं रद्द झाला. याचा फायदा भारतीय संघाला झाला. पावसामुळे पहिल्यांदाच भारतीय संघ फायनलमध्ये पोहचला आहे. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात भारतीय संघाचे प्रत्येकजण कौतुक करीत आहेत. सलामीवीर शेफाली वर्माचे नाव क्रिकेटच्या इतिहासात लेडी सेहवाग म्हणून घेतले जाते. मात्र या 11 महिला खेळाडूंबरोबरच आणखी एक व्यक्तीच्या मेहनतीने भारताला हे फळ मिळाले आहे. ते आहेत भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमन (W V Raman). डब्ल्यू.व्ही. रमन म्हणजेच वूरकेरी वेंकट रमन. हे नाव भारतीय क्रिकेट इतिहासात फार कमी वेळा घेतले गेले असावे. मात्र भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रमन यांनी भारतीय महिला संघाची जबाबदारी घेत, त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली. रमन यांनी भारतासाठी 11 कसोटी, 27 एकदिवसीय सामने खेळले. मात्र त्यांची खरी ओळख प्रशिक्षक म्हणून सर्वांसमोर आली. 14 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या रमन यांनी डिसेंबर 2018मध्ये महिला संघाची जबाबदारी स्वीकारली. वाचा- Eng vs Ind: पावसामुळे सामना रद्द, भारतीय महिला संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये
The #INDvENG semifinal is called off due to rain. #TeamIndia 🇮🇳🇮🇳 make it to their maiden #T20WorldCup final. pic.twitter.com/y4rfDWjzFi
— BCCI Women (@BCCIWomen) March 5, 2020
वाचा- VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई 14 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव रमन यांनी भारतासाठी 1988मध्ये पदार्पण केले. 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तामिळनाडूचा क्रिकेटर रमन तामिळनाडूचे प्रशिक्षक झाले. दोन वर्षांनंतर त्यांच्या करारास आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. जुलै 2010मध्ये ते बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाले. त्यानंतर 2013मध्ये रमन आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक झाले. पुढच्याच वर्षी 2014 मध्ये रमन आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाजीचे प्रशिक्षक झाले, या मोसमात त्याच्या संघानेही जेतेपद जिंकले. त्यानंतर 2015मध्ये बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रमन यांची नियुक्ती केली. तर, डिसेंबर 2018मध्ये भारतीय महिला संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. वाचा- दोन आठवड्यांआधी मृत्यूशी झाला होता सामना, आता 5 विकेट घेत उडवली फलंदाजांची झोप रमन यांची कारकीर्द भारतीय संघासाठी 1988मध्ये पदार्पण करणाऱ्या डब्ल्यू वी रमन (W V Raman) यांनी 11 कसोटी सामन्यात 24.88च्या सरासरीने 448 धावा केल्या. रमन यांनी 4 अर्धशतक लगावले तर त्यांनी सर्वोत्तम खेळी 96 आहे. याशिवाय त्यांनी 27 एकदिवसीय सामन्यात 23.73च्या सरासरीने 55.63च्या स्ट्राइक रेटने 617 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतक आहेत. याचबरोबर रमन यांनी 2-2 विकेटही घेतल्या आहेत.

)







