जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Zim: 'सुपर संडे'ला पहाटे 5.30 पासून सामने, भारत-झिम्बाब्वे मॅच 'या' वेळेत होणार सुरु

Ind vs Zim: 'सुपर संडे'ला पहाटे 5.30 पासून सामने, भारत-झिम्बाब्वे मॅच 'या' वेळेत होणार सुरु

भारत वि. झिम्बाब्वे

भारत वि. झिम्बाब्वे

Ind vs Zim: रविवारी होणाऱ्या तीन सामन्यांपैकी पहिला सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वा. सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय आणि आशियातल्या इतर क्रिकेट चाहत्यांना सकाळी लवकर उठावं लागणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 05 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात रविवारी सुपर 12 फेरीतील शेवटचे तीन सामने होणार आहेत. हे तिन्ही सामने ग्रुप 2 मधील आहेत. ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडनं सेमी फायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण ग्रुप 2 मध्ये अजूनही एकही टीम अधिकृतपणे सेमीसाठी पात्र ठरलेली नाही. दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ या सेमी फायनलच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत. त्यात भारताचा सामना झिम्बाब्वेशी आणि दक्षिण आफ्रिका नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म मानलं जात आहे. दरम्यान अखेरच्या दिवशी सामन्यांच्या वेळेत मात्र मोठा बदल पाहायला मिळत आहे. सकाळी 5.30 वा. पहिला सामना रविवारी होणाऱ्या तीन सामन्यांपैकी पहिला सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वा. सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय आणि आशियातल्या इतर क्रिकेट चाहत्यांना सकाळी लवकर उठावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या दोन टीम्स अॅडलेडच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. हा सामना संपल्यानंतर अॅडलेडमध्येच पाकिस्तान आणि बांगलादेश संघातला सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. हेही वाचा -  T20 World Cup: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ दोनपैकी एका टीमशी भारत खेळणार सेमी फायनल? मेलबर्नमध्ये भारत-झिम्बाब्वे निर्णायक लढत एमसीजीवर पाकिस्तानला सलामीच्या लढतीत हरवणारी टीम इंडिया पुन्हा मेलबर्नमध्ये पोहोचली आहे. भारतासाठी झिम्बाब्वेविरुद्धची ही लढत महत्वाची ठरणार आहे. झिम्बाब्वेचं पारडं टीम इंडियाच्या तुलनेत जड नसलं तरी याच टीमनं पाकिस्तानसारख्या टीमला हरवलं होतं. त्यामुळे झिम्बाव्वेला कमी लेखून चालणार नाही. हा सामना जिंकल्यास टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी राहील. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताचा सामना होईल तो जोस बटलरच्या इंग्लंडशी.

जाहिरात

भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 - ग्रुप 2 मेलबर्न क्रिकेट स्टेडियम, मेलबर्न भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. स्टार स्पोर्ट्स, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात