Home /News /sport /

INDvSL: रोहितच्या अनुपस्थितीचा विराट घेणार फायदा, हिसकावणार हिटमॅनचं सिंहासन

INDvSL: रोहितच्या अनुपस्थितीचा विराट घेणार फायदा, हिसकावणार हिटमॅनचं सिंहासन

रोहित-विराटमध्ये नव्या वर्षात रंगणार घमासान! कॅप्टन कोहली करणार या रेकॉर्डवर कब्जा.

    गुवाहटी, 04 जानेवारी : वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खिशात घातल्यानंतर नववर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. 5 जानेवारी रोजी भारत-श्रीलंका यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. दरम्यान या टी-20 मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं रोहितच्या अनुपस्थितीत विराटला फायदा होऊ शकतो. नवीन वर्षातील ही भारताची पहिली मालिका असून यावर्षी होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये टी -20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जातील. वाचा-भारत-श्रीलंका सामन्यावर CAAचे सावट, सामना होणार रद्द? दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी -20मध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. याक्षणी विराट आणि रोहित टी -20मध्ये बरोबरीत आहेत. विराटने 75 सामन्यांत 2633 धावा केल्या आहेत तर रोहितने 104 सामन्यात 2633 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत विराट रोहितला एक धाव काढताच मागे टाकणार आहे. वाचा-आऊट झालेल्या क्रिकेटपटूनं शिव्या घालताच अम्पायरनं बदलला निर्णय, मैदानात राडा विराटला गतवर्षी बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती, तर विराट आणि रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 मालिका खेळले होते. हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात विराटने नाबाद 94 धावांची खेळी केली होती. तर, तिसर्‍या सामन्यातही त्याने नाबाद 70 धावांची खेळी केली. दुसरीकडे रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात मध्ये 71 धावा केल्या होत्या. 2019मध्ये विराटने 10 सामन्यांत 466 धावा केल्या तर रोहितने 14 सामन्यांत 396 धावा केल्या. गेल्या वर्षी दोघांमध्ये टाय झाला होता. त्यामुळं नववर्षात विराटला रोहितला मागे टाकण्याची संधी असणार आहे. वाचा-धक्कादायक! महिला क्रिकेटपटूवर प्रशिक्षकाने केला बलात्काराचा प्रयत्न श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका 05 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी) 07 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर) 09 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे) भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या