मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND Vs SL: भारत-श्रीलंका सामन्यावर CAAचे सावट, सामना होणार रद्द?

IND Vs SL: भारत-श्रीलंका सामन्यावर CAAचे सावट, सामना होणार रद्द?

 जानेवारी रोजी भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर  खेळला जाणार आहे.

जानेवारी रोजी भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

जानेवारी रोजी भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

गुवाहटी, 03 जानेवारी : वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खिशात घातल्यानंतर नववर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. 5 जानेवारी रोजी भारत-श्रीलंका यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर हा खेळला जाणार आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात सध्या गुवाहटीमध्ये निदर्शने सुरू आहेत. त्यामुळं हा सामना रद्द होणार का? असा सवाल चाहत्यांमध्ये आहे.

बीसीसीआय आणि आसाम क्रिकेट असोसिएशन (ACA) सध्या गुवाहटीमधील आंदोलनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एसीएने असेही म्हटले आहे की सर्व काही नियंत्रणात आहे आणि सामना होईल. दरम्यान लसिथ मलिंगा यांच्या नेतृत्वात श्रीलंकेचा संघ गुरुवारी गुवाहाटीला पोहोचला. आज श्रीलंकेचा संघ नेटमध्ये सराव करेल. एसीएचे अध्यक्ष रोमेन दत्ता, पोलिस सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत आणि सर्व काही नियंत्रणात आहे. होय, हे खरं आहे की आधी येथे निदर्शने सुरू आहेत, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही स्टेडियम आणि दोन्ही संघांची सुरक्षा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी ते परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत”, यांनी असे सांगितले.

वाचा-IPLमध्ये 7 वर्षे एकत्र खेळूनही मलिंगाने काहीच नाही शिकवलं, बुमराहचा खुलासा

नवीन वर्षातील ही भारताची पहिली मालिका असून यावर्षी होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये टी -20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जातील.

वाचा-OMG! स्टीव्ह स्मिथने पहिली धाव घेताच स्टेडियममध्ये चाहत्यांचा जल्लोष, पाहा VIDEO

श्रीलंकेविरुद्ध मालिका

05 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी)

07 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर)

09 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे)

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.

वाचा-भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूला दणका, एका वर्षाची बंदी

CAAच्या समर्थनार्थ भाजपची नवी खेळी

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला होणारा विरोध लक्षात घेऊन भाजपही आता आक्रमक झालाय. CAAच्या समर्थनासाठी भाजपने आता जोरदार मोहीम उघडली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ट्विटरवर #IndiaSupportsCAA ही मोहीमही चालवली होती. त्यासाठी काही मान्यवरांचे व्हिडीओही त्यांनी ट्विट केले होते. CAAला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देशभर प्रचंड विरोध केलाय. त्यासाठी मोर्चे आणि निदर्शनही केली आहेत. हा वाढता विरोध लक्षात घेऊन त्याची धार कमी करण्यासाठी आता भाजपनेही पुढाकार घेतला असून आता मिस्ड कॉल देऊन नागरिकता सुधारणा कायद्याच्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भाजपनं मोहीम सुरु केलीय.

First published: