Home /News /sport /

आऊट झालेल्या क्रिकेटपटूनं शिव्या घालताच अम्पायरनं बदलला निर्णय, मैदानात झाला राडा

आऊट झालेल्या क्रिकेटपटूनं शिव्या घालताच अम्पायरनं बदलला निर्णय, मैदानात झाला राडा

भारतीय क्रिकेटमध्ये वाद, Out होताच ‘या’ स्टार क्रिकेटपटूनं पंचांनाच घातल्या शिव्या

    मोहाली, 03 जानेवारी : रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या दिल्ली आणि पंजाब (Delhi vs Punjab) यांच्यातील सामन्यात मोठा वाद झाला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubhman Gill) पंजाब संघाकडून खेळत आहे. शुभमनला पंचांनी बाद घोषित केल्यानंतर त्यानं मैदान सोडण्यास नकार दिला आणि पंचांनाच शिवी घातली. मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यांमुळं पुन्हा एकदा रणजीमधला एक मोठा वाद समोर आला आहे. चौथ्या दिवशीच खेळात पंजाबचा फलंदाज शुभमनला पंचांनी बाद केले. मात्र गिलनं मैदान सोडण्यात नकार दिला. त्यानंतर लगेच पंचांनी आपला निर्णय बदलला. त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी पंचांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर पंचांच्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाचा-भारत-श्रीलंका सामन्यावर CAAचे सावट, सामना होणार रद्द? 23 धावा करत बाद झाला गिल क्रिकट्रॅकरनं दिलेल्या बातमीनुसार, नितीश राणाच्या (Nitish Rana) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघानं पंचांनी निर्णय बदलला म्हणून मैदान सोडण्यास सुरुवात केली. कर्णधार नितीशनं शुभमन गिलवर (Shubhman Gill) पंचांना शिव्या घातल्याचाही आरोप केला. या सगळ्या गोंधळानंतर सामना पुन्हा सुरू झाला. अखेर गिल 41 चेंडूत 23 धावा करत बाद झाला. सिमरजीत सिंगच्या चेंडूवर विकेटकीपर अनुज रावतनं कॅच घेत गिलला बाद केले. वाचा-IPLमध्ये 7 वर्षे एकत्र खेळूनही मलिंगाने काहीच नाही शिकवलं, बुमराहचा खुलासा बऱ्यायाच काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये DRSची मागणी होत आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच रणजी करंडक स्पर्धेतही DRS यंत्रणा लागू करावी अशी मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. गेल्या काही मोसमात पंचांनी बर्‍याच चुका केल्या, ज्याचा सामना संघांना सहन करावा लागला. या वाईट निर्णयांचा परिणाम सामन्याच्या निकालावरही झाला आहे. वाचा-भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूला दणका, एका वर्षाची बंदी चेतेश्वर पुजाराला नॉट आऊट दिल्यानंतर झाला वाद रणजी करंडक स्पर्धेतील पंचांच्या निर्णयामुळे संघ प्रथमच नाखूष झालेले नाहीत. मागील सत्रात सौराष्ट्रचा फलंदाज चेतेश्वर पुजारालादेखील मैदानाच्या पंचाने नाबाद घोषित केले होते, तर चेंडू त्याच्या फलंदाजाच्या काठावरुन क्षेत्ररक्षकांकडे गेला. या मोसमातही पहिल्या फेरीच्या सामन्यात मोठा फलंदाज युसूफ पठाणने पंचांच्या मुंबईविरुद्ध बाद होण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्याचा असा विश्वास होता की चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या सहाय्याने शॉर्ट लेगमध्ये उभे असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या हातात गेला नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Shubman gill

    पुढील बातम्या