Home /News /sport /

धक्कादायक! करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत महिला क्रिकेटपटूवर प्रशिक्षकाने केला बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक! करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत महिला क्रिकेटपटूवर प्रशिक्षकाने केला बलात्काराचा प्रयत्न

दिल्लीच्या महिला क्रिकेटपटूनं मागितली खा. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागकडे मदत.

    नवी दिल्ली, 03 जानेवारी : दिल्ली येथील एका महिला क्रिकेटपटूनं प्रशिक्षकाने करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिला क्रिकेटपटूनं ट्वीट करत भाजप खासदार गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग यांच्याकडे मदत मागितली आहे. या महिला क्रिकेटपटूनं 30 डिसेंबर रोजी या ट्विट करत गौतम गंभीरकडे मदत मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सेहवागकडे मदत मागितली. अद्याप गंभीर किंवा सेहवागनं याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीच्या या महिला क्रिकेटपटूनं आपली व्यथा स्वत:च्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत मांडली आहे. या ट्विटमध्ये, “माझा प्रशिक्षक कारकिर्द संपवून टाकेन अशी धमकी देत बलात्कारचा प्रयत्न केला आहे’, असा खळबळजनक खुलासा केला आहे. या महिला क्रिकेटपटूच्या या ट्विटनंतर दिल्ली क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या क्रिकेटपटूच्या तक्रारीची दखल #MeTooIndiaने घेतली आहे. वाचा-तो पळत राहिला तरी मित्र करत होता चाकूने वार, हत्येचा थरारक VIDEO वाचा-बापरे...थंड नाश्ता दिला म्हणून सासऱ्याने केली सुनेची गोळी झाडून हत्या वाचा-VIDEO : शिंगांसह फुटबॉल खेळू लागलं हरिण, गोल केल्यानंतर केलं भन्नाट सेलिब्रेशन! वाचा-भारत-श्रीलंका सामन्यावर CAAचे सावट, सामना होणार रद्द? प्रशिक्षकाचे नाव न घेता केली तक्रार दरम्यान या क्रिकेटपटूनं आपली तक्रार करताना या प्रशिक्षकाचे नाव लिहिलेले नाही आहे. ट्वीट केलेल्या या पोस्टमध्ये, ”मी दिल्लीची एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक माझा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला तर तो करीअरच उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो. माझ्या प्रशिक्षकाचे संघ निवड समितीतील सदस्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांने माझ्या क्रिकेट करिअरला ब्रेक लावण्याची धमकी देत आहे. कृपया याची दखल घेत मला मदत करा”, असे सांगत गौतम गंभीरला टॅग केले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या