IND vs SA ODI Series : Virat Kohali पुन्हा बनणार ‘रन मशीन’! कॅप्टन्सी गेल्यानंतर ही असेल महत्त्वाची भूमिका
IND vs SA ODI Series : Virat Kohali पुन्हा बनणार ‘रन मशीन’! कॅप्टन्सी गेल्यानंतर ही असेल महत्त्वाची भूमिका
गेली दोन वर्षे एक बॅट्समन म्हणून विराट कोहलीसाठी चांगले ठरलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळ त्याच्यासाठी किती आव्हानात्मक असेल याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवी दिल्ली, 18 जानेवारी – भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या (India vs SA ODI Serires) वन डे सीरिजला बुधवारपासून सुरुवात होत आहे. के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टिम इंडिया (Team India) ही सीरिज जिंकून टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. ही सीरिज खूपच विशेष असणार आहे, कारण तिन्ही फॉरमॅटमचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीची (Virat Kohali) ही पहिली मॅच असेल.
वर्ष 2017 पासून विराट कोहली (Virat Kohali) व्हाइट बॉल फॉरमॅटचा कर्णधार होता. तर, 2014 पासून तो टेस्ट टिमचा कर्णधार होता. त्यामुळे आता दीर्घकाळानंतर विराट कोहली नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. एक बॅट्समन म्हणून गेले दोन वर्ष विराट कोहलीसाठी चांगले नव्हते. त्यामुळे आगामी काळ त्याच्यासाठी किती आव्हानात्मक असेल, यावर लक्ष ठेवावं लागेल.
टिम इंडिया अनेक दिवसांनंतर वन डे मॅच (ODI) खेळत आहे. वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. तो आता तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करताना दिसेल. या सीरिजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) नसल्यामुळे विराट कोहलीची जबाबदारी आणखी वाढणार आहे.
बुधवारच्या वन डेसाठी के एल राहुल आणि शिखर धवन (Shikhar Dhavan) यांची ओपनिंग जोडी निश्चित झालेली आहे. विराटला आता स्वतःचा फॉर्म परत मिळवण्याची तसेच रन्सचा वेग वाढवण्याची चांगली संधी चालून आली आहे. गेल्या काही वन डेचा रेकॉर्ड पाहिला, तर विराट कोहली जबरदस्त टचमध्ये दिसला आहे. विराट कोहली शेवटची वन डे इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यात तो फक्त 7 रन्स काढून आउट झाला होता. परंतु त्याने शेवटच्या चार इनिंग्जमध्ये सलग हाफसेंच्युरी केल्या आहेत. सध्या तो कॅप्टन नसल्यामुळे मोकळ्या मनाने खेळू शकतो.
विराट कोहली ‘द लिडर’
दीर्घकाळापासून टिम इंडियाचं नेतृत्व करणारा विराट कोहली सध्या कॅप्टन नाही. परंतु तो अजूनही लिडरशिप ग्रुपचा भाग राहणार आहे. टिममधील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक असेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के एल राहुलला सपोर्ट करण्यासाठी विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची असेल. कारण के एल राहुल एखाद्या सीरिजमध्ये पहिल्यांदाच टिमचं नेतृत्व करत आहे. 2019 पासून विराट कोहली एका शतकाच्या शोधात आहे. त्यामुळे तो कोणताही दबाव झुगारून खेळेल अशी शक्यता आहे. त्या वेळी त्याला स्वतःला एक्स्प्रेस होण्याची ही चांगली संधी असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा 'विराट कोहली- द रन मशीन' होणार असल्याचा त्याच्या फॅन्सला विश्वास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.