Home /News /sport /

धोती-कुर्ता घालून मैदानात उतरले खेळाडू, संस्कृतमध्ये कॉमेंट्री अन् मंत्रोच्चाराने उडवला टॉस; कुठे झाली ही मॅच? वाचा...

धोती-कुर्ता घालून मैदानात उतरले खेळाडू, संस्कृतमध्ये कॉमेंट्री अन् मंत्रोच्चाराने उडवला टॉस; कुठे झाली ही मॅच? वाचा...

क्रिकेटच्या मैदानावर चक्क संस्कृतमध्ये कॉमेंट्री. खेळाडूंनी नेसलं होतं धोतर आणि कुर्ता. कोणाच्या कपाळावर चंदनाचा टिळा, तर कोणाच्या गळ्यात रूद्राक्षाच्या माळा...

  भोपाळ, 18  जानेवारी – मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) मध्ये एका अनोख्या क्रिकेट सामन्याचे (Cricket Match)आयोजन करण्यात आलं होतं. या मॅचमध्ये वैदिक कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांनी धोती-कुर्ता (Dhoti-Kurta) घालून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. कोणाच्या कपाळावर चंदनाचा टिळा, तर कोणाच्या गळ्यात रूद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. भारतीय संस्कृतीला (Indian Culture) प्रोत्साहन देणं हा या सामन्यामागील उद्देश होता. या क्रिकेट मॅचचे वैशिष्ट्य होते की, मॅचची कॉमेंट्री संस्कृत भाषेत (Comentry in Sanskrit) करण्यात आली. संस्कृती बचाव मंचातर्फे (Sanskriti Bachao Manch) महर्षी महेश योगी यांच्या जन्मोत्सवानिमित्त या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. ही अनोखी क्रिकेट स्पर्धा वैदिक मंत्रोच्चारांनी (Vaidik Mantra)सुरू झाली. अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचं हे दुसरं वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये वैदिक संस्थांमध्ये पठण करणारे, भागवत कथा सांगणारे कर्माकांड करणाऱ्या ब्राह्मणांनी सहभाग घेतला होता. मॅच सुरू होण्यापूर्वी वैदिक मंत्रोच्चार करून नाणेफेक (Toss) करण्यात आली.
  चतुष्कम्, धावनम्, स्तोभरक्षकः...
  या मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना पिचला क्षिप्या, बॉलला कंदुकम्, सिक्सरला षठकम्, चौकारला चतुष्कम, रनला धावनम्, बॅट्समनला वल्लक, बॉलरला गेंदक, फिल्डरला क्षेत्ररक्षक आणि विकेटकिपरला स्तोभरक्षकः असे संबोधण्यात येत होते. संस्कृती बचाओ मंचाचे अध्यक्ष पंडित चंद्रशेखर तिवारी म्हणाले, की “मॅचमध्ये संस्थान एकादशने कपिल मुनी एकादशचा आठ विकेट्सनी पराभव केला”. पंडित कपिल शर्मा म्हणाले, की “प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूला वेद पुस्तक मिळाले. मॅन ऑफ द सीरिजसाठी पंचांग देण्यात आले”. विजेत्या टिमला 5001 आणि उपविजेत्याला 2100 रुपयांचा पुरस्कार मिळाला.

  IND vs SA ODI Series : पहिल्या सामन्यासाठी के एल राहुलने आपल्या बॅटिंग पोझिशनबद्दल केला हा खुलासा, कर्णधारपदाबद्दलही म्हणाला...

  सोशल मीडियावर प्रतिक्रिया या मॅचचे वृत्त सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होताच, युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणीतरी  लिहिल, “क्रिकेट का खेळत आहात?, हा तर इंग्राजांचा खेळ आहे”. एका युजरने लिहिले, “बुटाऐवजी पादुका घाला”. @aakashmehrotra ने लिहिलं, “इतकंच भारतीय बनायचं होतं, तर इंग्लिश खेळ का खेळत आहात? महाभारताप्रमाणे चौकट अंथरूण खेळा, आपली संपत्ती, पत्नी दावावर लावा”. @58Believ ने लिहिलं, “तसंही क्रिकेट हा पाश्चिमात्य खेळ आहे. तुम्ही भारतीय खेळ का खेळत नाही”? @RajuTG1972 ने लिहिलं, “बीसीसीआय कृपया भारतीय संघाची जर्सी हा बदल करा...हा आहे नवा भारत”. काही युजर्सनी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुकही केलं. @HinduBuddy ने लिहिलं, “टीका करणाऱ्यांना समजले पाहिजे. ते इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या फ्यूजनचा प्रयोग करत आहेत. त्यांना करू द्या. तुम्हाला काय त्रास होत आहे”?
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Bhopal News, Cricket, Cricket news

  पुढील बातम्या