जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA ODI Series : पहिल्या सामन्यासाठी के एल राहुलने आपल्या बॅटिंग पोझिशनबद्दल केला हा खुलासा, कर्णधारपदाबद्दलही म्हणाला...

IND vs SA ODI Series : पहिल्या सामन्यासाठी के एल राहुलने आपल्या बॅटिंग पोझिशनबद्दल केला हा खुलासा, कर्णधारपदाबद्दलही म्हणाला...

IND vs SA ODI Series : पहिल्या सामन्यासाठी के एल राहुलने आपल्या बॅटिंग पोझिशनबद्दल केला हा खुलासा, कर्णधारपदाबद्दलही म्हणाला...

भारत आणि दक्षिण (IND Vs SA) अफ्रिकेदरम्यान 19 जानेवारीला वन डे सीरिज सुरू होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन के एल राहुल (KL Rahul) याने त्याच्या बॅटिंग पोझिशनबद्दल खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

केपटाऊन, 18 जानेवारी- टिम इंडियाच्या वन डे मॅचचा कॅप्टन म्हणून के एल राहुल (KL Rahul) उद्यापासून मैदानात उतरत आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान  (India vs South Africa) तीन सामन्यांची वन डे सीरिज 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. वन डे टिमचा नवा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या जागी राहुल ओपनिंगसाठी उतरणार आहे. गेल्या काही काळापासून तो वन डेमध्ये 4 आणि 5 नंबरवर खेळत होता. परंतु रोहित खेळत नसल्याने तो वरच्या नंबरवर खेळायला येणार आहे. यापूर्वी झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये यजमान टिमनं 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता टिम इंडिया या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मॅचपूर्वी मीडियाशी बोलताना राहुल म्हणाला, की “गेल्या 14-15 महिन्यांपासून मी 4 किंवा 5 नंबरवर खेळत होतो. टिमला माझी तिथं गरज होती. परंतु आता रोहितही नाही. त्यामुळे मी टॉप ऑर्डरला खेळणार आहे”. कर्णधारपदावरून तो म्हणाला, की “मी एम एस धोनी(MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकलो आहे. शेवटी मीसुद्धा माणूस आहे आणि माझ्याकडून चुका होऊ शकतात. परंतु मी टिमला पुढे नेण्यासाठी तयार आहे”.

IPL 2022 : लखनऊने केएल राहुलसह ‘या’ दोघांची केली निवड, मोजले इतके रुपये

विराट कोहलीने केली मदत के एल राहुल म्हणाला, की विराट कोहलीनं विजय मिळवण्यासाठी आमच्यामधील विश्वास वाढवला आहे. तो टिमचा जबरदस्त कॅप्टन राहिला आहे. तो टिममधील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. माझ्याजवळ खूप साऱ्या योजना आहे असा मी माणूस नाही. मी एका वेळी एका गेमवर लक्ष देत आलो आहे. मी अशाच प्रकारे क्रिकेट खेळलो आहे. टिमलाही अशाच प्रकारे मी पुढे नेण्यासाठी तयार आहे. टिम इंडियाने शेवटच्या वेळी 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकाममध्ये खेळवण्यात आलेल्या 6 सामन्यांच्या वन डे सीरिजवर 5-1 असा कब्जा केला होता. या वेळीसुद्धा त्याचीच पुनरावृत्ती करण्याची टिमला इच्छा आहे. वन डे टिमची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात