India vs South Africa : टी-20 मालिकेत रोहित-विराटमध्ये होणार टक्कर, कोण मारणार बाजी?

India vs South Africa : टी-20 मालिकेत रोहित-विराटमध्ये होणार टक्कर, कोण मारणार बाजी?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना धर्मशाला 15 सप्टेंबरला होणार आहे.

  • Share this:

धर्मशाला, 14 सप्टेंबर : भारतीय संघानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात नमवल्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना धर्मशाला 15 सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे. तसेच, या मालिकेत भारतीय खेळाडूंकडे आपल्या नावावर काही विक्रम करण्याची संधीही मिळणार आहे. यात कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

भारताचा उप-कर्णधार रोहित शर्मा टी-20मध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. रोहितनं 96 सामन्यात 2422 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे विराट हा रोहितपेक्षा धावांच्या बाबतीत थोडा मागे आहे. कोहलीच्या नावावर 70 सामन्यात 2369 धावा आहेत. दोघांमध्ये सध्या केवळ 53 धावांचा फरक आहे, त्यामुळं कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.

याशिवाय विराट कोहलीनं टी-20मध्ये 231 चौकार लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर 215 चौकार आहेत. या दोघांशिवाय शिखर धवन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवननं टी-20मध्ये 6959 धावा आहेत. त्यामुळं 7 हजार धावा करण्यासाठी धवनला फक्त 44 धावांची गरज आहे.

वाचा-धोनीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर विराटनं दिलं उत्तर, म्हणाला...

टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

Loading...

तीन टी20 सामन्यांची मालिका

पहिला टी20 सामना 15 सप्टेंबर, धर्मशाला

दुसरा टी20 सामना 18 सप्टेंबर, मोहाली

तिसरा टी20 सामना, 22 सप्टेंबर, बेंगळुरू

(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.)

वाचा-भारत दक्षिण आफ्रिका टी20 मालिका रविवारपासून, जाणून घ्या वेळापत्रक

टी 20 साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

तीन सामन्यांची कसोटी मालिका

पहिली कसोटी : 02 ते 06 ऑक्टोंबर, विशाखापट्टणम

दुसरी कसोटी : 10 ते 14 ऑक्टोंबर, पुणे

तिसरी कसोटी : 19 ते 23 ऑक्टोंबर, रांची

(सर्व कसोटी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होतील.)

कसोटीसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल.

वाचा-मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप

गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...