ICC Under 19 Asia Cup : मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कपचा किताब

ICC Under 19 Asia Cup : मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कपचा किताब

ICC Under 19 Asia Cup : अथर्वनं 8 ओव्हरमध्ये 28 धावा देत 5 विकेट घेत उत्कृष्ठ कामगिरी केली.

  • Share this:

कोलंबो, 14 सप्टेंबर : ICC Under 19 Asia Cupमध्ये भारतानं सातव्यांदा आशियाई कपचा किताब मिळवला. अटीतटीच्या या सामन्यात भारतानं अवघ्या पाच धावांमध्ये बांगलादेशला नमवले. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं भारताचा संपूर्ण संघ 106 धावांचा बाद झाला. दरम्यान बांगलादेशनं 33 ओव्हरमध्ये 101 धावांतच गारद झाली. यात भारताचा हिरो ठरला हो मुंबईकर अथर्व अंकोलेकर. अथर्वनं 8 ओव्हरमध्ये 28 धावा देत 5 विकेट घेत उत्कृष्ठ कामगिरी केली.

मुंबईतील एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलानं केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंडर-19 आशियाई कपच्या अंतिम सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी सेमीफायनलचा सामना न खेळताच फायमनमध्ये प्रवेश केला. पावसामुळं सेमीफायनलचा सामना होऊ न शकल्यामुळं लीग स्टेजमध्ये सर्व सामने जिंकत भारत आणि बांगलादेश यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात फलंदाजीमध्ये कर्णधार ध्रुवनं चांगली कामगिरी केली. मात्र गोलंदाजांनी या सामन्यावर पकड मिळवली.

अंतिम सामन्यात हिरो ठरलेला अथर्व दहा वर्षांचा असताना 2019मध्ये बेस्टमध्ये कंडक्टर असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अर्थवची आई वैदही अंकोलेकर यांनी कंडक्टरची नोकरी स्विकारत अर्थवला वाढवले. अथर्व डावखुरा फिरकीपटू असून सध्या रिझवी कॉलेजमध्ये 12वीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान अर्थवची संघात निवड झाल्यानंतर त्याच्या आईला जवळजवळ 40 हजार संदेश आले होते.

वाचा-नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन

आईनं हिम्मत न सोडता वाढवले

डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अथर्वची संघात निवड झाल्यानंतर खुप लोकांनी चांगले संदेश दिले असे सांगितले. यावेळी वैदही यांनी, “माझे पती विनोद बेस्टमध्ये कंडक्टर होते. घरात ते एकटे कमवणारे होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही एकटे पडलो. तेव्हा मी इतरांच्या मदतीनं क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मलाही बेस्टमध्ये नोकरी मिळाली.

वडिलांच्या आठवणीत असतो अर्थव

वैदही या मरोल बस डेपोत काम करतात, त्या 186 आणि 340 बसमध्ये काम करतात. तर, अथर्व वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मदत करतो. मात्र, क्रिकेट खेळताना किंवा अभ्यास करताना वडिलांच्या आठवणीत असतो. भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अर्थवनं खुप मेहनत केली आहे. अर्थव यांनी, “जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाबा उश्याखाली क्रिकेटची बॅट ठेवायचे. जेव्हा मी चांगली कामगिरी करायचो, तेव्हा ते मला बक्षिस द्यायचे. या सगळ्याची मला खुप आठवण येते.

वाचा-धोनीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर विराटनं दिलं उत्तर, म्हणाला...

अथर्वनं सचिनला केले होते बाद

9 वर्षांपूर्वी एका सराव सामन्यादरम्या अथर्वनं मास्टर ब्लास्टर सचिनला बाद केले होते. सचिनचं त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. सचिनला बाद केल्यानंतर त्यांनी स्वत:ची सही असलेली एक बॅटही बक्षिस म्हणून अथर्वला दिली होती.

VIDEO: मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण

Published by: Akshay Shitole
First published: September 14, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading