धर्मशाला, 14 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. दरम्यान या सामन्याआधी विराटन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काही दिवसांपूर्वी महेद्रसिंग धोनीसोबत विराटनं सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोनं वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. विराटनं तो फोटो टाकल्यानंतर धोनीच्या निवृत्तीसंदर्भात बातम्या येऊ लागल्या. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं या संदर्भात भाष्य केले. दक्षिण आफ्रिकाविरोधात होत असलेल्या मालिकेत महेंद्रसिंग धोनीला संधी मिळाली नाही. त्यामुळं या टी-20 सामन्यातही धोनी दिसणार नाही. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. सोशल मीडियावर या धोनीचा क्रिकेट संन्यास चर्चेत आला त्यामागे कॅप्टर विराट कोहली याचं एक ट्वीट होतं. गुरुवारी विराटने त्याच्या Twitter हँडलवरून एक मेसेज केला. विराटने या मेसेजबरोबर एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात तो धोनीपुढे झुकून त्याचा सन्मान करत असल्याचं दिसतंय. या माणसाने त्या दिवशी मला असं काही धावायला लावलं होतं की मी फिटनेस टेस्ट देत होतो जणू… स्पेशल नाईट… त्या दिवशीचा खेळ मी कधीच विसरणार नाही!
A game I can never forget. Special night. This man, made me run like in a fitness test 😄 @msdhoni 🇮🇳 pic.twitter.com/pzkr5zn4pG
— Virat Kohli (@imVkohli) September 12, 2019
धोनीसोबतच्या फोटोवर विराट म्हणाला… सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं, “माझ्य़ा मनातही असे काही नव्हते. मी घरी बसलो होतो आणि फोटो टाकला आणि आता त्याची बातमी झाली. यामुळं मला एक शिकवण मिळाली, की मी जो विचार करतो तसा विचार लोकं करत नाहीत. लोकांनी ही गोष्ट वाढवली, जे खरं नाही आहे. त्या सामन्याबद्दल मी कधीच काही बोललो नव्हतो म्हणून मी तो फोटो टाकला”, असे सांगितले. वाचा- धोनीच्या निवृत्तीवर बातमीवर निवड समितीच्या प्रमुखांचा मोठा खुलासा
फिरकी गोलंदाज आमची ताकद “फिरकी गोलंदाजी ही आमची ताकद आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाला तुम्ही कमी लेखू शकत नाही. आम्ही 120 टक्के प्रयत्न करतो, सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतो”, असे सांगितले. तसेच, कोहलीनं संघाचे कौतुक करत, आमच्या संघात सगळ्याप्रकारचे कॅम्बिनेशन आहे, असे सांगितले. वाचा- धोनी संध्याकाळी 7 वाजता जाहीर करणार क्रिकेट संन्यास? विराटच्या Tweet मुळे चर्चा निवड समितीचे स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख MSK Prasad यांनी धोनीच्या निवृत्तीचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. एम एस के प्रसाद यांनी एम एस धोनीच्या निवृत्तीविषयी काहीही माहिती आमच्याकडे नाही. सोशल मीडियात फिरणारं वृत्त चुकीचं आहे, असं म्हटलं आहे. **वाचा-** नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन VIDEO: मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण