नवी मुंबई, 04 मार्च : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पांड्या सध्या नवी मुंबईत होत असलेल्या डीव्हाय पाटील टी-20 टुर्नामेंटमध्ये खेळत आहे. या सामन्यात पांड्या गोलंदाजांवर तुफान बरसताना दिसत आहे. मंगळवारी शानदार शतकी खेळी केल्यानंतर पांड्याने आजही आक्रमक खेळी केली. रिलायन्स वन संघाकडून खेळताना पांड्याने 29 चेंडूत 46 धावांची खेळी केली. याच 4 षटकारांचा समावेश होते. या स्पर्धेत पांड्याचा स्ट्राईक रेट जवळ जवळ 158 आहे. 18 षटकार 189 धावा हार्दिक पांड्याने या स्पर्धेत 3 सामन्यात 189 धावा केल्या. मुख्य म्हणजे पांड्याने 18 षटकारांच्या मदतीने ही खेळी केली. पांड्याने पहिल्या सामन्यात 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. तर, दुसऱ्या सामन्यात 10 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. आता तिसऱ्या सामन्यात त्यानं 4 षटकार लगावत 46 धावा केल्या. वाचा- BCCI देणार कोहलीला दणका! आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूला करणार कर्णधार?
वाचा- गांगुलीचा हुकुमी एक्का आता झाला निवड समितीचा प्रमुख, BCCIने केली घोषणा गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी पांड्याने या स्पर्धेत फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. पांड्याने दोन डावात 10 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यात पांड्याने 26 धावा देऊन 5 विकेट घेतल्या, तर दुसर्या सामन्यात त्याने 26 धावांत 5 बळी घेतले. वाचा- सौराष्ट्र संघ फायनलमध्ये! IPLमध्ये 8.40 कोटींना विकत घेतलेल्या गोलंदाज ठरला हिरो भारतीय संघात मिळणार जागा? हार्दिक पांड्याचा शानदार कमबॅक पाहता, त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. या मालिकेत विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

)







