Home /News /sport /

गांगुलीचा हुकुमी एक्का आता झाला निवड समितीचा प्रमुख, BCCIने केली घोषणा

गांगुलीचा हुकुमी एक्का आता झाला निवड समितीचा प्रमुख, BCCIने केली घोषणा

बीसीसीआयने ज्येष्ठ निवड समितीसाठी सुनील जोशी आणि हरविंदरसिंग यांची नावे निश्चित केले आहे. आता हे दोन निवड समितीचे प्रमुख दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करतील.

    मुंबई, 04 मार्च : भारतीय क्रिकेट संघाला दोन नवीन निवड समितीचे प्रमुख मिळाले आहे. आता हे दोन निवड समितीचे प्रमुख दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी 2 नवीन निवड समितीची घोषणा केली. बीसीसीआयने ज्येष्ठ निवड समितीसाठी सुनील जोशी आणि हरविंदरसिंग यांची नावे निश्चित केले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंह आणि महिला खेळाडू सुलक्षणा नाईक यांच्यासह क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) बुधवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत All-India Senior Selection Committee (Men) यांच्या दोन सदस्यांची निवड करण्यात आली, त्यात सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांचा समावेश आहे, हे दोन माजी खेळाडू आता एमएसके प्रसाद आणि गगन खोदा यांची जागा घेतील. क्रिकेट सल्लागार समितीने सुनील जोशी यांची भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून करण्याची शिफारस केली होती. सीएसी या उमेदवारांच्या कामाचा एक वर्षासाठी आढावा घेईल आणि त्यानंतर बीसीसीआयकडे अहवाल सादर करेल. निवड समितीत सहभागी होणारे हे दोन सदस्य देवांग गांधी, सरनदीप सिंग आणि जतीन परांजपे यांच्याबरोबर काम करतील. तथापि, या तीन निवडकांचा कार्यकाळ पुढील एक वर्षात संपेल. सुनील जोशी यांनी भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. 2001मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात सुनील जोशी यांनी 92 धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर त्यांनी 8 विकेटही घेतल्या होत्या. जोशी यांच्या या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला होता. सुनील जोशी यांची कारकीर्द भारतीय निवड समितीचे नवे प्रमुख सुनील जोशी यांनी 1996-2000 दरम्यान भारतीय संघासाठी 15 कसोटी सामने खेळले आहेत. तर, 1991-2001मध्ये 69 एकदिवसीय सामने खेळले आगेत. सुनील जोशीने कसोटी क्रिकेटमध्ये 41 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 69 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी निवड समितीचा दुसरा सदस्य म्हणून निवड झालेल्या हरविंदरसिंगने 1998 ते 2001 या कालावधीत भारतीय संघासाठी 3 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यात त्याने कसोटीत 4 विकेट आणि एकदिवसीय सामन्यात 24 विकेट घेतल्या होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या