मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आफ्रिका दौऱ्यात केएल राहुल होऊ शकतो कर्णधार, तर विराटच्या फेव्हरेट खेळाडूला मिळणार डच्चू

आफ्रिका दौऱ्यात केएल राहुल होऊ शकतो कर्णधार, तर विराटच्या फेव्हरेट खेळाडूला मिळणार डच्चू

हरभजन सिंगनेसुद्धा चौथ्या क्रमांकाबद्दल चिंता व्यक्त करताना केएल राहुलशिवाय दुसरा योग्य पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

हरभजन सिंगनेसुद्धा चौथ्या क्रमांकाबद्दल चिंता व्यक्त करताना केएल राहुलशिवाय दुसरा योग्य पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मायदेशात खेळणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 07 मार्च : भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा मानहानीकारक पराभवाने संपला. टी-20 मालिकेत शेर ठरलेला भारतीय संघाला एकदिवसीय आणि कसोटीमध्ये मात्र क्लीन स्विपचा सामना करावा लागला. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मायदेशात खेळणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल. दरम्यान याच महिन्यात आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असल्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. यात विराट कोहली सतत क्रिकेट असल्यामुळं कोहली विश्रांती घेऊ शकतो, तर रोहित जखमी आहे. त्यामुळं भारताला या मालिकेत नवा कर्णधार मिळू शकतो. सध्या केएल राहुलचे नाव कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. या संघात ऋषभ पंतला डच्चू दिला जाऊ शकतो. पंतला गेल्या कित्येक सामना चांगली कामगिरी करता आलेली नाही.

वाचा-हार्दिक पांड्याचा जलवा! 20 सिक्सर मारत अवघ्या 26 चेंडूत केल्या 144 धावा

नवीन निवड समिती प्रथमच संघाची निवड करेल

टीम इंडियाला आता नवीन निवड समिती मिळाली आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने माजी मुख्य फिरकीपटू सुनील जोशी यांची नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेची घोषणा करण्याचे पहिले सुनील जोशी करतील. न्यूझीलंड दौर्‍यावर कर्णधार विराट कोहली फारच अपयशी ठरला होता. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याने केवळ 38 धावा करता आल्या. त्यामुळं विराटला काही काळ विश्रांती दिली जाऊ शकते.

वाचा-आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन

विराटला देणार विश्रांती तर रोहित अनफिट

मिडीया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा अजूनही फिट झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून त्यानं माघार घेतली. काही दिवसांपूर्वी रोहितनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावही केला. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

केएल राहुलकडे असणार संघाचे कर्णधारपद?

विराट आणि रोहित शर्मा दोघांना आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विश्रांती दिल्यास, भारताला नवा कर्णधार मिळू शकतो. काही मिडीया रिपोर्टनुसार केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत राहुलने चांगली कामगिरी केली होती. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. त्यामुळं राहुलकडे कर्णधारपद जाऊ शकते.

वाचा-‘आता IPLवर माझं करिअर नाहीतर...’, भारताच्या अव्वल फिरकीपटूने व्यक्त केली भीती

शिखर-हार्दिक करणार कमबॅक

भारताचा हुकुमी एक्का हार्दिक पांड्याने सप्टेंबर 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो गेले कित्येक महिने मैदानाबाहेर होता. सध्या पांड्या फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळू शकते. नुकत्याच डीव्हाय पाटील टी-20 लीगमध्ये हार्दिक पांड्याने 39 चेंडूत 105 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तर, शानदार गोलंदाजी करत 5 विकेटही घेतल्या होत्या. तर, शिखर धवनही फिट झाल्यामुळं त्यालाही संघात जागा मिळू शकते.

असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका दौरा

12 मार्च- पहिला एकदिवसीय सामना (कोलकाता)

15 मार्च- दुसरा एकदिवसीय सामना (लखनऊ)

18 मार्च-तिसरा एकदिवसीय सामना (कोलकाता)

First published:

Tags: Cricket, Kl rahul, Virat kohli