गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: गुवाहाटीतल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान एक अजब प्रकार घडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन तेम्बा बवुमानं टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलनं भारताला दणकेबाज सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली. भारतीय डावादरम्यान एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे मैदानात रोहित शर्मा, लोकेश राहुलसह दक्षिण आफ्रिकन खेळाडू इतकच नव्हे तर डगआऊटमधील खेळाडूही हैराण झाले. मैदानात सापाची एन्ट्री सातव्या ओव्हरनंतर भारताच्या स्कोअर बोर्डवर बिनबाद 68 धावा लागल्या होत्या. पण त्याचवेळी मैदानात एका पाहुण्याची एन्ट्री झाली. त्यामुळे सर्वांची चांगलीच पळापळ झाली. गुवाहाटीतल्या या ग्राऊंडवर चक्क साप घुसला आणि त्याला पाहताच सगळेच जण हैराण झाले. त्यामुळे काही वेळासाठी अम्पायर्सना खेळ थांबवावा लागला. काही वेळानं ग्राऊंड्समननी सापाला पकडल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला.
रोहित- राहुलची दमदार सुरुवात या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं लोकेश राहुलसह भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली. रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. दरम्यान रोहितच्या टी20 कारकीर्दीतला हा 400 वा सामना ठरला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजनं या दोघांनाही माघारी धाडलं. हेही वाचा - Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, आयपीएल गाजवणारा ‘हा’ खेळाडू टीम इंडियात टीम इंडियाची नजर मालिकाविजयावर दरम्यन टीम इंडियानं जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आजचा सामना जिंकला तर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर मायदेशात मिळवलेला हा पहिलाच मालिकाविजय असेल. कारण दक्षिण आफ्रिकेनं भारतात एकही मालिका गमावलेली नाही. 2015-16 साली दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या तीन मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं एक जिंकली आहे तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.