मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, आयपीएल गाजवणारा 'हा' खेळाडू टीम इंडियात

Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, आयपीएल गाजवणारा 'हा' खेळाडू टीम इंडियात

शिखर धवन

शिखर धवन

Ind vs SA ODI: मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. तर गेल्या मोसमात आयपीएल गाजवणाऱ्या रजत पाटीदारला भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 2 ऑक्टोबर: टी20 मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकाही खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. धवनच्या नेतृत्वात हा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. तर गेल्या मोसमात आयपीएल गाजवणाऱ्या आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

भारताचा वन डे संघ - धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, सिराज, दीपक चहर

रजत पाटीदार, मुकेश कुमारला पहिल्यांदाच संधी

वर्ल्ड कप टीममध्ये स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश असलेले श्रेयस अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोईला वन डे टीममध्ये जागा मिळाली आहे. वन डे सीरीजनंतर ते ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. भारताच्या वन डे टीममध्ये संजू सॅमसनचंही कमबॅक झालं आहे. पण त्याचबरोबर आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला संघात स्थान मिळालंय. रजतनं गेल्या आयपीएल मोसमात प्ले ऑफमध्ये शतक ठोकलं होतं. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही त्यानं मध्य प्रदेशकडून खेळताना फायनलमध्ये महत्वपूर्ण शतकी खेळी साकारली होती. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेतही रजतनं धावा केल्या होत्या. रजत पाटीदारसह बंगालच्या मुकेश कुमारलाही पहिल्यांदाच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा - Road Safaty World Series: ट्रॉफी जिंकताच सचिननं 'या' दोघांसोबत केलं खास सेलिब्रेशन, पाहा Video

भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे मालिका

पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, रांची

दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ

तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

वन डे मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे.

First published:

Tags: Cricket news, Shikhar dhawan, Sports, Team india