India vs South Africa : 'आमचा वेळ फुकट घालवण्याचा तुम्हाला काय हक्क', सामना रद्द झाल्यानंतर BCCIची शाळा

India vs South Africa : 'आमचा वेळ फुकट घालवण्याचा तुम्हाला काय हक्क', सामना रद्द झाल्यानंतर BCCIची शाळा

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिलाच टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला.

  • Share this:

धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रविवारी धर्मशाला येथील एचपीसीए मैदानावर खेळवला जाणार होता. मात्र, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिलाच टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. मुसळधार पावसामुळं मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, त्यामुळं टॉस न होताच सामना रद्द करण्यात आला.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून धर्मशाला परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आजच्या सामन्यात ग्राऊंटस्टाफनं मैदान सुखवण्याचा प्रयत्न केला मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर अखेर हा सामना रद्द करण्यात आला.

दरम्यान दक्षिण आफ्रिका विरोधात पहिलाच सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी BCCIची चांगलीच शाळा घेतली. ट्विटरवर चाहत्यांनी राग व्यक्त करत, पावसाळ्यात सामना ठेवतातच कशाला असा सवाल केला. तसेच, आमचा वेळ वाया का घालवला, असा रागही चाहत्यांनी व्यक्त केला.

वाचा-पावसामुळं चाहत्यांचा रविवार गेला वाया, पहिला टी-20 सामना रद्द!

वाचा-पंत तुझा पत्ता कट होणार, कारण माझा आवडता खेळाडू तयार; ऋषभला 'गंभीर' इशारा

टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

वाचा-लाईव्ह सामन्यात झाली मोठी गडबड! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 18 सप्टेंबरला दुसरा सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे. तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे.

वाचा-धोनीच्या पत्नीच्या HOT फोटोंमुळे धिंगाणा, बेबीपासून लव्ह यूपर्यंत कमेंट्स!

VIDEO: भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पवारांवर केली टीका, 'अभिमान आहे पण.... '

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2019, 10:34 PM IST

ताज्या बातम्या