धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-20 सामना धर्मशाला मैदानावर होणार आहे. ही मालिका पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मात्र, पहिल्याच सामन्यावर पावसाचा धोका आहे. गेल्या काही दिवसात धर्मशाला परिसरात मुसळधार पाऊस आहे. दरम्यान रविवार दुपारपर्यंत मुसळधार पावसाच्या सरींमुळं आजचा सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. मात्र हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी काळे ढग आणि पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं सामना काही काळ उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय संघानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात नमवल्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना धर्मशाला 15 सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे. मात्र या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे.
वाचा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 सामना आज, या ठिकाणी पाहू शकता लाइव्ह जर पाऊस पडला तर काय होणार भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सात वाजता सामना सुरू होणार आहे. जर सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस असल्यास सामना पाच-पाच ओव्हरचा केला जाऊ शकतो. जर पाऊस पाच वाजेपर्यंत थांबला तर, सामना 20 ओव्हरचाच होईल. दरम्यान मैदानावर पाणी काढण्याची चांगली व्यवस्था असल्यामुळं सामन्यादरम्यान पाऊस पडला तरी सामन्याला लगेचच सुरुवात होऊ शकते. जलद गोलंदाजांना होणार फायदा पावसामुळं जर मैदानावर दव पडले तर त्याचा फायदा जलद गोलंदजांना होऊ शकतो. भारतानं टी-20 संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली आहे. तर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी या खेळाडूंना संघात जागा दिली आहे. त्यामुळं भारताची मदार ही युवा खेळाडूंवर असणार आहे. वाचा- युवा ब्रिगेड पहिल्या टी-20साठी सज्ज! ‘या’ 11 खेळाडूंना विराट देणार संघात जागा चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. वाचा- टी-20 मालिकेत रोहित-विराटमध्ये होणार टक्कर, कोण मारणार बाजी? या भारतीय खेळाडूंना संघात मिळणार स्थान पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांचे स्थान कायम राहिल. धवननं भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला किंवा मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. श्रेयसनं वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. ऋषभ पंतचे स्थान कायम राहू शकते. तसेच, संघात कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघात असतील. गोलंदाजीमध्ये नवदीप सैनी, खलील अहमद आणि दीपक चाहर यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते. टी 20 साठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी. **वाचा-** क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ते पे सत्ता! सलग 7 चेंडूत लगावले 7 सिक्स! काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO