क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ते पे सत्ता! सलग 7 चेंडूत लगावले 7 सिक्स!

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ते पे सत्ता! सलग 7 चेंडूत लगावले 7 सिक्स!

बांगलादेशमध्ये तीन देशांमध्ये होत असलेल्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि नजीबुल्लह जादरान यांनी एक नवा विक्रम केला आहे.

  • Share this:

ढाका, 14 सप्टेंबर : क्रिकेटच्या इतिहासात याआधी सहा चेंडूवर सहा षटकार लगावण्याची कामगिरी अनेक फलंदाजांनी केली आहे. मात्र पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी एक अजब पराक्रम केला आहे. बांगलादेशमध्ये तीन देशांमध्ये होत असलेल्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि नजीबुल्लह जादरान यांनी एक नवा विक्रम केला आहे. झिम्बाम्वे विरोधात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या या दोन फलंदाजांनी सात चेंडूत सलग सात षटकार लगावले.

या सामन्यात मोहम्मद नबीनं 4 तर, नजीबुल्लाहनं 3 षटकार लगावले आहे. या दोघांची आक्रमक फलंदाज एक व्हाईड गोलंदाजीमुळं थांबली. यानंतरच्या चेंडूवर नजीबुल्लाहनं चौकार लगावला. नबी आणि जादरान यांनी चक्क 8 चेंडूत 47 धावा केल्या. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदात सात चेंडूंवर सात षटकार मारण्याची कामगिरी केली. या दोघांच्या तुफानी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानं 197 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या संघानं दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाम्वेचा संघ 169 धावाच करू शकला. त्यामुळं अफगाणिस्ताननं या सामन्यात 28 धावांनी विजय मिळवला.

नबी-नजीबुल्लाहनं 40 चेंडूत केली शतकी भागीदारी

या सामन्यात नबीनं 18 चेंडूचा सामना केला यात 38 धावांची खेळी केली. तर, नजीबुल्लाहनं 30 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं नाबाद 69 धावा केल्या. नबी-नजीबुल्लाह मैदानात उतरले तेव्हा अफगाणिस्तानची परिस्थिती 13.2 ओव्हरमध्ये 90 वर 4 विकेट अशी परिस्थिती होती. त्यानंतर 40 चेंडून या दोघांनी 107 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचव्या विकेटसाठी ही दुसरी सर्वात जास्त भागीदारी ठरली आहे. याआधी पाकिस्तानत्या शोएब मलिक आणि मिस्बाह-उल-हक यांनी 2007मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 119 धावांची भागीदारी केली होती.

वाचा-KBC मध्ये 7 कोटींसाठी स्पर्धेकाला विचारला प्रश्न, पण ट्रोल झाला सचिन

असे लगावले सात चेंडूत 7 षटकार

अफगाणिस्तानच्या डावात 17व्या ओव्हरमध्ये झिम्बाम्वेचा तेंदई चटारा गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूंवर नबी स्ट्राईकवर होता.

16.3: चटारानं लेग कटर चेंडू टाकला, या चेंडूवर नबीनं बॅकफूटवर जाऊन डीप मिडविकेटच्यावर षटकार मारला.

16.4: यावेळी चटारानं फुल लेंथ चेंडू टाकला. मात्र यॉर्करचा हा प्रयत्न फार वाईट होता, त्यामुळं नबीनं गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू थेट सीमारेषेपार टाकला.

16.5: सलग दोन षटकार मारल्यानंतर चटारानं फुलटॉस चेंडू दिला. या चेंडूवर नबीनं क्रिझ सोडून डीप मिडविकेटच्यावरून षटकार मारला.

16.6: चटाकारानं पुन्हा एका फुलटॉस चेंडूचा वापर केला. यावेळी नबीनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्यावरून षटकार मारला.

त्यानंतर 18व्या ओव्हरमध्ये नेव्हिल मादव्हिझा गोलंदाजीसाठी आला. यावेळी नजीबुल्लाह स्ट्राईकरवर होता.

17.1: माजविझाच्या लेंथ बॉलवर नजीबुल्लाहनं मिडविकेटच्या वरून षटकार मारला. त्यामुळं सलग 5 चेंडूत 5 षटकार मारले गेले.

17.2: सलग 5 षटकारांनंतर माझव्हिझानं वाईट चेंडू टाकला परिणामी नजीबुल्लाहनं जोरदार षटकार मारला.

17.3: झिम्बाम्वेच्या गोलंदाजीची पिसं काढल्यानंतर शेवटच्या चेंडूवरही नजीबुल्लाहनं षटकार मारत इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सात चेंडूवर सात षटकार लगावले.

वाचा-पहिल्या टी-20 सामन्याआधी चाहत्यांसाठी मोठी बातमी, असं असेल धर्मशालाचं हवामान

'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2019 09:39 PM IST

ताज्या बातम्या