धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारतीय संघानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात नमवल्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना आज धर्मशाला मैदानावर होणार आहे. दरम्यान ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे. तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. या भारतीय खेळाडूंना संघात मिळणार स्थान पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांचे स्थान कायम राहिल. धवननं भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला किंवा मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. श्रेयसनं वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. ऋषभ पंतचे स्थान कायम राहू शकते. तसेच, संघात कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघात असतील. गोलंदाजीमध्ये नवदीप सैनी, खलील अहमद आणि दीपक चाहर यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते.
वाचा- KBC मध्ये 7 कोटींसाठी स्पर्धेकाला विचारला प्रश्न, पण ट्रोल झाला सचिन तीन टी20 सामन्यांची मालिका पहिला टी20 सामना 15 सप्टेंबर, धर्मशाला दुसरा टी20 सामना 18 सप्टेंबर, मोहाली तिसरा टी20 सामना, 22 सप्टेंबर, बेंगळुरू (सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.) वाचा- पहिल्या टी-20 सामन्याआधी चाहत्यांसाठी मोठी बातमी, असं असेल धर्मशालाचं हवामान टी 20 साठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी. वाचा- मुंबईकर अथर्व अंकोलेकरची ‘बेस्ट’ कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप भारताचा संभाव्य संघ रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी. ‘एकच साहेब पवार साहेब’, मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO