धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. धर्मशाला इथं पहिला सामना आज सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. कर्णधारपदी विराट कोहली कायम असून अजिंक्य राहणेकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच नवख्या शुभमन गिलला सलामीवीर केलएल राहुलच्या जागी संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी20 सामन्याचं लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. याशिवाय भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. तीन टी20 सामन्यांची मालिका पहिला टी20 सामना 15 सप्टेंबर, धर्मशाला दुसरा टी20 सामना 18 सप्टेंबर, मोहाली तिसरा टी20 सामना, 22 सप्टेंबर, बेंगळुरू (सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.) तीन सामन्यांची कसोटी मालिका पहिली कसोटी : 02 ते 06 ऑक्टोंबर, विशाखापट्टणम दुसरी कसोटी : 10 ते 14 ऑक्टोंबर, पुणे तिसरी कसोटी : 19 ते 23 ऑक्टोंबर, रांची (सर्व कसोटी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होतील.) टी 20 साठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी कसोटीसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल, VIDEO: अनधिकृत होर्डिंग्ज पुणेकरांना मनस्ताप; वाहतूक कोंडीत अॅम्ब्युलन्स अडकली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.