Home /News /sport /

IND vs NZ : टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा

IND vs NZ : टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ दुसरा कसोटी सामना शनिवारपासून खेळणार आहे. मात्र या सामन्याआधी कर्णधार आणि उपकर्णधारात वाद असल्याचे समोर आले आहे.

    क्राइस्टचर्च, 28 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ दुसरा कसोटी सामना शनिवारपासून खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 10 विकेटनं पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळं या मालिकेत क्लिन स्वीप टाळण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र या सामन्याआधी कर्णधार आणि उपकर्णधारात वाद असल्याचे समोर आले आहे. चेतेश्वर पुजाराच्या मुद्द्यावरून रहाणे आणि कोहली आमने सामने आले आहे. विराट कोहलीनं वेलिंग्टन कसोटीमध्ये धिम्या गतीनं फलंदाजी केलेल्या पुजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रहाणेनं पुजाराची बाजू घेतली आहे. रहाणेनं सांगितले की, “पुजारा पूर्णत: प्रयत्न करत आहे की तो आपल्या धावांवर लक्ष केंद्रित करेल. मात्र बोल्ट, साऊदी यांसारख्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळं पुजारावर टीका करणे योग्य नाही”. पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराला मोठी खेळी करता आली नव्हती. वाचा-दुसऱ्या सामन्याआधी विराटला मोठा धक्का! स्टार फलंदाज झाला जखमी कोहलीनं पुजारावर साधला होता निशाणा वेलिंग्टन कसोटीत पुजारा दोन्ही डावांमध्ये फ्लॉप होता, त्याने पहिल्या आणि दुसर्‍या डावात 11-11 धावा केल्या. त्याच्या दुसर्‍या 11 धावांची खेळी जरी अत्यंत संथ होती. पुजाराने 81 चेंडूत 11 धावा काढल्या होत्या. कसोटी गमावल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. सामन्यानंतर विराट कोहलीने पुजारावर निशाणा साधत, '' माझ्यामते फलंदाजी युनिट म्हणून आपण वापरत असलेली भाषा दुरुस्त करावी लागेल. मला वाटत नाही की सावधगिरी बाळगणे किंवा खूप काळजी घेणे मदत करेल कारण अशा परिस्थितीत आपण आपले शॉट्स खेळू शकणार नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विराट कोहलीला खेळण्याची संधी देखील दिली नाही, ज्यामुळे तो दोन्ही डावांमध्येही फ्लॉप झाला. विराटने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या जावात 2 आणि 19 अशा धावा केल्या. वाचा-क्रिकेट सोडून धोनी करतोय शेती! पपई, टरबूजाची लागवड करतानाचा VIDEO VIRAL सलामीवीरांचा फ्लॉप शो एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटीमध्येही मयंक आणि पृथ्वी शॉ यांची जोडी चांगली कामगिरी करू शकली नाही. पहिल्या डावात या दोघांनी 16 धावांची भागीदारी केली तर दुसऱ्या डावात 27 धावांची. दुसऱ्या डावात मयंकने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉला चांगली कामगिरी करता आली नाही. वाचा-एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग पृथ्वी शॉच्या पायाला आली सूज टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सरावादरम्यान पृथ्वी शॉच्या पायाला सूज आली आहे. आज डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. पायाच्या दुखापतीमुळं बुधवारी पृथ्वी सराव करू शकला नाही. जर शॉचे रिपोर्ट गंभीर आले तर त्याला दुसऱ्या सामन्यात कदाचित संधी मिळणार आहे. त्यामुळं गिलला संधी मिळू शकते. गिलने आतापर्यंत भारताकडून एकही सामना खेळलेले नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, India vs new Zealand, Virat kohli

    पुढील बातम्या