क्राइस्टचर्च, 27 फेब्रुवारी : भारतीय संघ 28 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारत 1-0नं पिछाडीवर आहे. त्यामुळं क्लीन स्विपपासून वाचण्यासाठी भारताला विजयाची गरज आहे. मात्र या सामन्याआधी विराटला मोठा झटका बसला आहे. भारताचा एक खेळाडू सरावादरम्यान जखमी झाला आहे.
वेलिंग्टनमध्ये फलंदाजांची सुमार दर्जाची कामगिरी केली होती. त्यामुळं भारताला हा सामना गमवावा लागला होता. यात सलामीवीर पृथ्वी शॉला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. आता पृथ्वी शॉला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यात शॉ खेळणार की नाही याबाबत साशंकता आहेत. त्यामुळं या सामन्यात शुभमन गिलला संधी मिळू शकते.
वाचा-‘सचिनने खेळाडूंवर अन्याय केला’, माजी क्रिकेटपटूनं मास्टर ब्लास्टरवर केली टीका
पृथ्वी शॉच्या पायाला आली सूज
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सरावादरम्यान पृथ्वी शॉच्या पायाला सूज आली आहे. आज डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. पायाच्या दुखापतीमुळं बुधवारी पृथ्वी सराव करू शकला नाही. जर शॉचे रिपोर्ट गंभीर आले तर त्याला दुसऱ्या सामन्यात कदाचित संधी मिळणार आहे. त्यामुळं गिलला संधी मिळू शकते. गिलने आतापर्यंत भारताकडून एकही सामना खेळलेले नाही.
वाचा-विजयी हॅट्रिकसह भारताची सेमीफायनलमध्ये धडक! न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव
गीलला मिळू शकते संधी
दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे आहे जेथे गेल्या महिन्यात न्यूझीलंड ए विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुभमन गिलने दुहेरी शतक झळकावले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने 83 धावा केल्या, तर दुसर्या डावात त्याने नाबाद 204 धावा केल्या. तरी गीलला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली अशी अपेक्षा आहे.
वाचा-एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग
सलामीवीरांचा फ्लॉप शो
एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटीमध्येही मयंक आणि पृथ्वी शॉ यांची जोडी चांगली कामगिरी करू शकली नाही. पहिल्या डावात या दोघांनी 16 धावांची भागीदारी केली तर दुसऱ्या डावात 27 धावांची. दुसऱ्या डावात मयंकने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉला चांगली कामगिरी करता आली नाही.
वाचा-विराटची मोठी चूक, पराभवाचं खापरं टॉसवर फोडलं पण आकडे वेगळंच सांगतात
कोहलीने पृथ्वी शॉचा बचाव केला
दोन्ही डावांमध्ये फ्लॉप झालेल्या पृथ्वी शॉचा बचाव करताना कोहली म्हणाला, 'पृथ्वीने घराबाहेर दोनच सामने खेळले आहेत. तो एक चांगला खेळाडू आहे आणि धावा करण्यासाठी एक मार्ग सापडेल. मयंकने दोन्ही डावात चांगला खेळ केला. तो आणि रहाणे असे फलंदाज आहेत जे थोड्याच वेळात लय मिळवू शकतात”. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आता 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेचा दुसरा सामना 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs new Zealand, Virat kohli