मुंबई, 19 फेब्रुवारी : आयपीएलच्या तेराव्हा हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. हंगामातील पहिलाच सामना हा हायवोल्टेज होणार आहे. कारण हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या या हंगामाआधी मुंबईचे काही खेळाडू जखमी झाले आहे. यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा समावेश आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे हार्दिकनं गेले कित्येक महिने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र आयपीएलआधी कमबॅक करण्यासाठी पांड्या सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. आयपीएलमध्ये हार्दिकच्या कमबॅकचे संकेत मंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी कोच शेन बॉंडने दिले आहे. शेन बॉंडने, हार्दिक कंबरेच्या दुखापतीतून सावरत आयपीएलआधी कमबॅक करेल, असे सांगितले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाआधी हार्दिक काही सामने खेळू शकतो. हार्दिक पांड्या शानदार कमबॅक करेल, असा विश्वासही शेन बॉंड यांनी व्यक्त केला. **वाचा-** धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना शेन बाँड म्हणाले की, “मला फक्त अशी आशा आहे की, आयपीएलपूर्वी त्याला काही क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळेल आणि मला नेहमीच विश्वास आहे. आम्ही हार्दिकबाबत हलगर्जी करणार नाही. थोडा जास्त वेळ घेणे जास्त चांगले”. तसेच, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर काम करत आहे. त्यामुळं मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्याआधी पांड्या फिट होईल, अशी अपेक्षा आहे. वाचा- 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक या संघाविरुद्ध करणार कमबॅक हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी घरेलु सामने खेळणार आहे. त्यामुळं पांड्या मुंबईत होणाऱ्या डीवाय पाटील टी-20 लीगमध्ये (DY Patil T20 Tournament) रिलायन्स संघाकडून खेळताना दिसेल. त्यामुळं आता हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी टी-20 लीग खेळणार आहे. डीवाय पाटील टी-20 लीगनंतर हार्दिक आयपीएल खेळताना दिसेल. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला 28 मार्च 2020पासून सुरुवात होणार आहे. वाचा- ‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन! 6 महिने क्रिकेटपासून दूर आहे पांड्या गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -20 सामन्यात 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पाठीला दुखापत झाली होती. टी -20 वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआयने पंड्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठविले. शस्त्रक्रियेनंतर न्यूझीलंड दौऱ्यात त्याचा संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती. असे झाले नसले तरी त्याची निवड न्यूझीलंडच्या भारत अ दौर्यासाठी झाली, परंतु वरिष्ठ संघात नाही. मात्र, नंतर मॅच फिटनेस नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर पांड्या पुन्हा एकदा लंडनला गेला आणि तेव्हापासून एनसीएमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहे. हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे आणि लवकरच संघात परतला पाहिजे अशी भारतीय संघाची इच्छा आहे. या दौर्यावर न्यूझीलंडविरूद्ध संघात अष्टपैलू अभाव होता. टी -२० वर्ल्ड कपपूर्वी पंड्या तंदुरुस्त असावा आणि चांगल्या फॉर्ममध्ये संघात स्थान मिळावे अशी भारतीय संघाची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







