'...नाहीतर विराटसारखी अवस्था होईल', फोटो पोस्टवरून पोलिसांनी दिला सल्ला

'...नाहीतर विराटसारखी अवस्था होईल', फोटो पोस्टवरून पोलिसांनी दिला सल्ला

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉ यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचे मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिका संपली आहे. त्यानंतर आता दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 21 फेब्रुवारीपासून ही कसोटी मालिका सुरू होईल. 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यासाठी अजुन वेळ असल्याने टीम इंडियाचे खेळाडू एन्जॉय करत आहेत.

क्रिकेटच्या सरावानंतर मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत भारतीय खेळाडू फिरण्यासाठी बाहेर पडतात. अधुनमधून ते फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉसोबतचा फोटो शेअर केला आहे. चित्रविचित्र हावभाव केलेला हा फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर मीम्स तयार झाली नसती तर नवलच.

सध्या या तिघांच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटो शेअर करताना विराटने नवीन पोस्ट सुंदर दोस्त असं म्हटलं आहे. त्यावर भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने हा भैय्या असं विचारलं आहे.

विराटने शेअर केलेल्या या फोटोचा वापर करून नागपूर पोलिसांनी पालकांना एक सल्ला दिला आहे. स्कल ब्रेकर चॅलेंजचा धुमाकूळ सोशल मीडियावर आहे. ते करू नका नाहीतर अशी अवस्था होईल असं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे.

वाचा : श्रीनिवासनंतर आणखी एक इंडियन बोल्ट, 100 मीटर अंतर फक्त 9.51 सेकंदात केलं पार?

वाचा : इन्स्टाग्रामवर रोनाल्डोसमोर विराट 'गरीब', फुटबॉलपटूची वर्षाची कमाई थक्क करणारी

First published: February 18, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या