वेलिंग्टन, 19 फेब्रुवारी : सध्या क्रिकेटपटूंना सतत क्रिकेट खेळावे लागत आहे. परिणामी त्यांच्या फिटनेसवर याचा थेट परिणाम होतो. त्यामुळं खेळाडूंना बऱ्याचवेळा दुखापतींना सामोरे जावे लागते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी अनेकदा वर्क लोडबाबत भाष्य केले आहे. एवढेच नाही तर बीसीसीआयवर टीकाही केली आहे. कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे सर्व फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारे कर्णधार आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर दबावही जास्त असतो. त्याचबरोबर आयपीएलमुळे त्यांना विश्रांतीचा कालावधी मिळत नाही. त्यामुळं या सगळ्याला कंटाळून विराट लवकरच निवृत्तीचा विचार करू शकतो. वाचा- दुहेरी शतक झळकवणाऱ्या खेळाडूला विराट देणार नाही संधी! यआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच म्हटले आहे की, 2021 टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर करणार. यानंतर आता भारतीय कर्णधारांवरील कामाचा वाढता तणाव लक्षात घेता विराटही असे कठोर निर्णय घेऊ शकतो. वाचा- मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! IPLआधी फिट होणार रोहितचा हुकुमी एक्का कामाच्या दबावाला कंटाळला कोहली? भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला निवृत्तीबाबत विचारण्यात आले. यावेळी कोहलीने 2021 टी -20 वर्ल्ड कपनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा विचार करीत आहोत, असे स्पष्ट केले. याबाबत बोलताना कोहलीने, “तीन वर्षांपासून स्वत: ची तयारी करत आहे”, असे उत्तर दिले. कोणत्याही एका प्रकारातून निवृत्तीचा विचार करण्याऐवजी तो तीन वर्षांपासून स्वतःला तयार करण्यावर भर देत असल्याचे भारतीय कर्णधार म्हणाला. वाचा- VIDEO : ‘आमचे कांदे खाता, मग क्रिकेट खेळायला काय?’ पाक क्रिकेटपटूची भारतावर टीका 35 नंतर भविष्यावर निर्णय यावेळी कोहलीने, थकवा आणि वर्कलोड व्यवस्थापनाच्या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे असे मान्य केले. तसेच, “जवळजवळ 8 वर्षांपासून वर्षातून 300 दिवस खेळत आहे. ज्यामध्ये प्रवास आणि सराव सत्रांचा समावेश आहे”, असे सांगत जेव्हा मी 34 किंवा 35 वर्षांचा होईन तेव्हा मी नक्की भविष्याचा विचार करेन, असे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







