वेलिंग्टन, 19 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 21 फेब्रुवारी (शुक्रवारी) सुरू होईल. दरम्यान या सामन्याआधी विराटनं कोणत्या खेळाडूंना संधी देणार याचे संकेत दिले. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा जखमी झाल्यामुळं त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी पृथ्वी शॉला संघात स्थान मिळाले, मात्र कसोटीमध्ये त्याला संधी मिळणार की नाही, याबाबत विराटनं स्पष्टीकरण दिले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहलीनं हे संकेत दिले आहेत की पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालसोबत डावाची सुरुवात शुभमन गिल करणार नाही. त्यामुळं पृथ्वी शॉला पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळणार आहे हे स्पष्ट झाले आहे. वाचा- ‘…नाहीतर विराटसारखी अवस्था होईल’, फोटो वापरून पोलिसांनी दिला सल्ला बुधवारी विराट कोहलीने पृथ्वी शॉचे कौतुक केले आणि सांगितले की, त्यांचा नैसर्गिक खेळ त्यांने खेळावा अशी संघाची इच्छा आहे. पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं, “पृथ्वी शॉ हा एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे, त्याचा स्वतःचा खेळ आहे आणि तो जसा खेळतो तो खेळ फायद्याचा आहे”, असे सांगितले. तसेच, “मयंकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. पृथ्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल आणि मयंक आपला फॉर्म कायम ठेवेल”, असेही यावेळी त्यानं स्पष्ट केले. वाचा- मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी सज्ज
The two Captains pose for the shutterbugs ahead of the two match Test series.
— BCCI (@BCCI) February 19, 2020
Who do you reckon is taking this trophy home ?#NZvIND pic.twitter.com/a6z4dkO6s6
पृथ्वी शॉ आणि मयंक करणार सलामीला फलंदाजी युवा सलामीवीर पृथ्वी शॉबद्दल कोहलीच्या वक्तव्यानंतर पृथ्वी शॉ वेलिंग्टन कसोटीत प्रथमच परदेशी भूमीवर कसोटी सामना खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉवर बीसीसीआयनं बंदी घातली होती. त्यानंतर आता पुनरागमन करत पृथ्वी शॉ पुन्हा उतरणार आहे. पृथ्वी शॉने भारतीय संघासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून 1 शतक व 1 अर्धशतक झळकावले आहे. वाचा- भारताच्या फलंदाजाचे कंबरडे मोडण्यासाठी किवी उतरवणार हुकुमी एक्का! दुहेरी शतकानंतरही गिलला संघात जागा नाही न्यूझीलंड ए विरुद्ध भारत अ साठी शुभमन गिलने दुहेरी शतक आणि एक शतकही झळकावले होते. मात्र तरी त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान आता न्यूझीलंडविरुद्धही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आ की, गिलला संघात जागा मिळणार नाही. गेल्या अनेक कसोटी सामन्यांपासून शुमन गिल संघाबरोबर होता, परंतु त्याला एका सामन्यात संधी मिळाली नाही. भारताचा संभाव्य संघ- मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमार विहारी, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन / रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा.

)







