पुणे, 23 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला (India vs England) दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाली. बॉल अडवण्यासाठी अय्यरने उडी मारली, त्यावेळी तो डाव्या खांद्यावर पडला, यानंतर अय्यरला खूप त्रास झाला. लगेचच टीम इंडियाचे फिजियो नितीन पटेल (Nitin Patel) मैदानात आले. दुखापत गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. अय्यरच्याऐवजी शुभमन गिलला (Shubhaman Gill) फिल्डिंगला बोलावण्यात आलं. श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असेल तर त्याला वनडे सीरिजमधूनही बाहेर राहावं लागू शकतं. बीसीसीआयकडून (BCCI) मात्र याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. श्रेयस अय्यरला जर उरलेल्या दोन मॅचमध्ये खेळता आलं नाही, तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर भारताला उपयोगी ठरू शकतो. टी-20 सीरिजमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या बॉलवर सूर्यकुमार यादवने सिक्स मारली होती. आपल्या पहिल्याच टी-20 इनिंगमध्ये सूर्यकुमारने 28 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
#INDvsENG
— pakas2009@gmail.com (@pakas2009) March 23, 2021
Uf Hitman ko mark ki haal ne kiya hit#RohithSharma pic.twitter.com/km1sMhFzLm
या मॅचमध्ये श्रेयस अय्यरशिवाय उपकर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला. बॅटिंग करत असताना रोहितच्या हाताला दुखापत झाली. मार्क वूडने टाकलेला बॉल रोहितच्या हाताला लागला, यानंतर रोहितच्या हातातून रक्तही यायला लागलं, पण रोहितने बॅटिंग सुरू ठेवली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. 28 रन करून रोहित आऊट झाला.