मुंबई, 1 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील अंतिम सामना आज पारपडणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि भारताने मालिकेतील एक एक सामने जिंकल्यामुळे सध्या मालिका बरोबरीत आहे. तेव्हा मालिका विजयासाठी आजचा सामना दोन्ही संघांकरता करो या मरो चा असणार आहे. तेव्हा भारतीय संघ वनडे प्रमाणेच टी 20 मध्येही न्यूझीलंडला नमवून मालिका विजय प्राप्त करतो का? हे पाहाणं उत्सुकतेचं असेल. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि श्रीलंके विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताने प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश देऊन मालिका विजयावर नाव कोरले होते. परंतु रांची येथे न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेतील पहिलया सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे तिसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश देण्याची संधी भारताने गमावली. पहिला सामना गमावल्यानंतर लखनौ येथे झालेला दुसरा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता. आजचा सामना मालिका विजयासाठी अत्यंत महत्वाचा असल्यामुळे भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा सन्मान कधी होणार सामना : बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. आजचा सामना सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर नाणेफेक पारपडले. कुठे पाहाल सामना : न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. तसेच डिझनी + हॉटस्टार अँपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल.
भारताचा टी 20 संघ : शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, मुकेश कुमार, पृथ्वी शॉ, उमरान मलिक न्यूझीलंड टी २० संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (डब्ल्यू), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (सी), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, हेन्री शिपले, बेन लिस्टर