मुंबई, 31 जानेवारी : रविवारी पारपडलेल्या आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा दारुण पराभव करत, पहिल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा करिष्मा करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर सर्वस्थरातून भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचे कौतुक होत असतानाच आता बीसीसीआयतर्फे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले 'बाबां'च्या चरणी, पाहा PHOTO
भारताच्या अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा सन्मान भारताचा माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याची माहिती दिली आहे.
It is with great delight I share that Bharat Ratna Shri @sachin_rt and @BCCI Office Bearers will felicitate the victorious India U19 team on Feb 1st in Narendra Modi Stadium at 6:30 PM IST. The young cricketers have made India proud and we will honour their achievements.
— Jay Shah (@JayShah) January 30, 2023
उद्या बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिकेतील शेवटचा सामना पारपडणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या हस्ते अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा सन्मान करण्यात येईल. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा सन्मान सोहोळा आयोजित केला जाणार आहे.
भारतीय अंडर 19 महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने त्यांना 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका येथे वर्ल्ड कप खेळून भारताचा अंडर 19 महिला संघ आज मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर संपूर्ण संघ उद्या बुधवारी अहमदाबाद येथे सन्मान सोहोळ्यासाठी रवाना होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Cricket news, Indian women's team, Sachin tendulkar, T20 cricket