मुंबई, 30 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील दुसऱ्या सामना हा लखनौ येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 99 धावांवर रोखले. परंतु 100 धावांचा टप्पा पार करत असताना भारतीय खेळाडूंची दमछाक झाली. तेव्हा भारताचा डाव सावरण्यासाठी नेहमी चौकार शटकारांची आतिषबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने संथ खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
With young and energetic SKY (Mr. 360°) at official residence, Lucknow.@surya_14kumar pic.twitter.com/hHGB2byHcu
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 30, 2023
लखनौमधील दुसरा सामना झाल्यानंतर सोमवारी सूर्यकुमारने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यांच्या भेटीचा फोटो योगींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : भारताचा क्रिकेटपटू मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
काही नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत सूर्यकुमार हा 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढताना दिसेल असे म्हंटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्यकुमार यादव सोबत फोटो शेअर करत त्याला Mr. 360° असे म्हंटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Suryakumar yadav, Team india, Uttar pardesh, Yogi Aadityanath