जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ Match Preview: तिसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट, भारताचं स्वप्न भंगणार?

IND vs NZ Match Preview: तिसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट, भारताचं स्वप्न भंगणार?

IND vs NZ Match Preview: तिसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट, भारताचं स्वप्न भंगणार?

पाच सामन्यांपैकी एक एकदिवसीय सामने आणि एक टी२० सामना पावसामुळे वाया गेला. तर एका टी२० सामना पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे टाय झाला.

  • -MIN READ mumbai
  • Last Updated :

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून बुधवारी अखेरचा सामना होणार आहे. या सामन्यात पाऊस पडू नये अशी प्रार्थना भारतीय संघ करत आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही तर भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत बरोबरी करण्याची संधी असणार आहे. ख्राइस्टचर्चमध्ये बुधवारी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जर पाऊस पडला तर भारतीय संघासह क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशा पडेल. पाच सामन्यांपैकी एक एकदिवसीय सामने आणि एक टी२० सामना पावसामुळे वाया गेला. तर एका टी२० सामना पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे टाय झाला. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल. हेगले ओव्हल मैदानावर वेगवान गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी असले. गेल्या काही वर्षात या मैदानावर सरासरी २३० धावा झाल्या आहेत. पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजी हा चर्चेचा विषय राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज शिखर धवनला कल्पना आहे की पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या संघात संधी मिळावयाची असेल तर खेळात बदल करावा लागले. हे ही वाचा : IND vs NZ: भारत ४१ वर्षे जुने नकोसं रेकॉर्ड टाळणार का? गावस्करही रोखू शकले नव्हते शुभमन गिलने दोन सामन्यात ५० आणि नाबाद ४५ धावा केल्या. भारतीय क्रिकेटमधील सध्याचा सुपरस्टार सूर्यकुमार यादवने सेडोन पार्कवर १२.५ षटकांच्या खेळात तीन षटकार खेचले. भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर सूर्या आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंनी चांगली खेळी केली पाहिजे. पंतचे एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगेल आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यापासून त्याचा सूर हरपला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर मधल्या फळीत खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज आहे. पंतच्या खेळण्यामुळे आणि फलंदाजांमध्ये गोलंदाजी करू शकणाऱ्या पर्यायांच्या अभावामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा बाहेर बसवावं लागेल. गेल्या सामन्यात अष्टपैलू असलेल्या दीपक हुडाला संधी दिली गेली. आधीचा सामना पावसामुळे वाया गेला, आता हंगामी मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतात की नाही हे पाहावं लागेल. फिरकीपटू कुलदीप यादवला अद्याप संधी मिळालेली नाही. हे ही वाचा :  BCCI Selection Committee: सचिनच्या मित्रासह 50 जणांनी भरला फॉर्म, पाहा BCCI कधी करणार नव्या सिलेक्टर्सची घोषणा? शार्दुल ठाकूर पहिल्या एकदिवसीय सामन्यात फारशी कमाल करू शकला नाही. अर्शदीप सिंह, दीपक चाहर आणि उमरान मलिक वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री, टीम साउदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना भारतीय फलंदाजांच्या कमकुवत बाजूंचा फायदा घेण्याची संधी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दोन्ही संघ भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शाहबाज अहमद, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह, शार्दुल ठाकुर आणि उमरान मलिक. न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), फिन एलेन, डेविन कॉनवे, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, टिम साउदी, मॅट हेन्री, एडम मिल्ने, जिमी नीशाम, मिशेल सेंटनर आणि लॉकी फर्ग्यूसन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात