मुंबई, 29 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिला सर्वात मोठा घाव घातला तो निवड समितीवर. वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघनिवडीवर कडाडून टीका झाली. त्यामुळे भविष्यातल्या स्पर्धांचा विचार करता बीसीसीआयनं नवी निवड समिती आणण्याचा निर्णय घेतला आणि चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय निवड समिती बरखास्त करण्यात आली. आता नव्या निवड समितीसाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले होते. त्यासाठी 28 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. त्यानुसार आतापर्यंत जवळपास 50 अर्ज दाखल झाले आहेत. सचिनच्या मित्राचा अर्ज निवड समितीसाठी एकूण 50 पेक्षा जास्त जणांनी अर्ज केला आहे. त्यात माजी फिरकी गोलंदाज मनिंदर सिंग, शिव सुंदर दास यांनी बीसीसीआयच्या सिनियर पॅनेल पोस्टसाठी अर्ज केला आहे. या दोघांनी भारतासाठी 20 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त अजित आगरकरनं आपला फॉर्म भरला की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही. आगरकरनं जर फॉर्म भरला असेल तर बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदासाठी त्याचं नाव नक्की मानलं जात आहे. हेही वाचा - IPL Auction: अखेर ‘या’ खेळाडूनं आयपीएल लिलावासाठी रजिस्टर केलं नाव, लागणार करोडोंची बोली? मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या सिनियर संघाचे सध्याचे सिलेक्टर सलील अंकोला, माजी विकेट किपर समीर दिघे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणीपासूनचा मित्र आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळी यांनीही अर्ज दाखल केले आहेत. हेही वाचा - Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? ‘या’ खास अॅक्शनमुळे झाली होती चर्चा… जानेवारीआधी होणार घोषणा आलेल्या अर्जदारांच्या मुलाखत प्रक्रियेनंतर नव्या निवड समितीची घोषणा होईल. जानेवारीआधी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. याचं कारण बांगलादेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. नवी निवड समिती त्या दौऱ्यासाठी संघनिवड करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.