मुंबई, 18 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना पारपडत असून आज दुसऱ्या दिवशी सामना सुरु होताच भारताला तीन धक्के मिळाले आहेत. भारताचे सलामीवीर फलंदाज के एल राहुल, कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद झाले असून भारताचा संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 263 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला. परंतु सामना सुरु होताच 18 व्या षटकादरम्यान भारताचा उपकर्णधार के एल राहुल 41 चेंडूत अवघ्या 17 धावा करून बाद झाला. यावेळी समालोचकानी के एल राहुल हा सतत फ्लॉप होत असल्याने त्याने याकडे जाणीवपूर्णक लक्ष द्यावे असा सल्ला दिला.
के एल राहुल नंतर मैदानात आपला 101 वा सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाऱ्याने कर्णधार रोहित शर्मा सोबत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 20 वे षटक सुरु असताना नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक करणारा कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच पुढच्या चेंडूत ऑस्ट्रेलियाच्या घटक गोलंदाजांनी चेतेश्वर पुजाराची देखील विकेट घेतली. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या सामन्यात भारतासाठी एकही धाव करू शकला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Kl rahul, Rohit sharma, Team india, Test cricket