मुंबई, 18 जानेवारी : दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस असून यात ऑस्ट्रेलियाने दिलेले 263 धावांच आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. परंतु सामन्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटूला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक चेंडू काल सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरच्या हाताच्या कोपऱ्यावर लागला. ही दुखापत झाल्यानंतर वॉर्नर फार वेदनेत दिसला यावेळी तात्काळ फिजिओला मैदानावर बोलवण्यात आले होते. डेव्हिड वॉर्नरची ही दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान ख्वाजा याने पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना सांगितले की, “डेव्हिड वॉर्नरच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे, तेव्हा सध्या तो वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली असून तो पुन्हा या कसोटी सामन्यात मैदानावर येईल की नाही हे त्याच्या तब्बेतीतील सुधारणेवर अवलंबून असेल”. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला तर मॅट रेनशॉ याला खेळण्याची संधी मिळू शकते. रेनशॉने नागपुरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेला पहिला कसोटी सामना खेळला होता. परंतु यात त्याने पहिल्या डावात अवघ्या 2 धावा तर दुसऱ्या डावात 0 धावा करून बाद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.