Home /News /sport /

ICC Women Cricket T20 World Cup : VIDEO : कधी काळी मुलगा बनून खेळायची क्रिकेट! आता झाली 'लेडी सेहवाग'

ICC Women Cricket T20 World Cup : VIDEO : कधी काळी मुलगा बनून खेळायची क्रिकेट! आता झाली 'लेडी सेहवाग'

भारताला मिळाला नवा ‘सेहवाग’, 16व्या वर्षी उडवतेय गोलंदाजांची झोप.

    पर्थ, 25 फेब्रुवारी : विरेंद्र सेहवागचे (Virender Sehwag) नाव समोर येताच एका अशा फलंदाजाची छबी दिसते, ज्याला पाहून गोलंदाजांची झोप उडले. खेळपट्टीवर पाऊल ठेवताच तो षटकार किंवा चौकारने आपल्या खेळीची सुरुवात करतो. त्यामुळं आजही क्रिकेट इतिहासात सेहवागने नाव सन्मानाने घेतले जाते. विरेंद्र सेहवागने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्यासारख्या स्फोटक सलामीवीराचा शोध भारताला लागला नाही आहे. मात्र आता भारताला एक नवी लेडी सेहवाग मिळाली आहे. आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत दुसऱ्या सामन्यात बांगलादेशलाही पराभूत केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या खेळणाऱ्या भारतीय माजी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात 17 धावांनी पराभूत केल्यानंतर दुबळ्या बांग्लादेशवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. यात शेफाली वर्मानं 17 चेंडूत 36 धावांची जबरदस्त खेळी केली. वाचा-World Cup 2020 : भारताचा दमदार विजय, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला केलं पराभूत
    वाचा-धवन म्हणाला 'गब्बर इज बॅक'! फिल्मी स्टाईल फोटो शेअर करत केली कमबॅकची घोषणा वयाच्या 16व्या वर्षी केली कमाल खरं तर टीम इंडियाला अखेर दुसरा विरेंद्र सेहवाग मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र हा सेहवाग विराट कोहलीच्या पुरुष संघात नाही तर हरमनप्रीत कौरच्या महिला संघाला सापडला आहे. शेफाली वर्मा असे या फलंदाजाचे नाव आहे. आपल्या छोट्या कारकीर्दीत 16 वर्षीय शेफाली वर्माने गोलंदाजांची झोप उडवली आहे. एकेकाळी क्रिकेटच सराव करण्यासाठी शेफाली मुलगा बनून जायची. आता तिला क्रिकेटमध्ये लेडी सेहवागचे स्थान मिळाले आहे. वाचा-VIDEO: ट्रम्प यांची भविष्यवाणी! IPL 2020 जिंकणाऱ्या संघाचे सांगितले नाव? ऑस्ट्रेलिया-बांगलादेशविरुद्ध दिसले रौद्र रूप भारतीय महिला संघाची (Indian Women Team) सलामीवीर शेफाली वर्माने (Shafali Verma) महिला टी-20 वर्ल्ड कपच्या (Womens T20 World Cup) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली होती. यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अशीच खेळी तिनं बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात केली. या सामन्यात शेफालीनं 17 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यात 2 चौकार आणि 4 षटाकारांचा समावेश होता. वाचा-केएल राहुलला मिळाली संघात जागा, मालिका जिंकण्यासाठी घेतला मोठा निर्णय या कारणामुळं होते सेहवागशी तुलना शेफाली वर्माची तुलना विरेंद्र सेहवागशी करण्यामागे अनेक कारणे आहेत. यात सगळ्यात मोठे कारण आहे, त्यांच्या डोळे आणि हात यांचा ताळमेळ. विरेंद्र सेहवागप्रमाणे शेफाली वर्माचा खेळ प्रामुख्याने डोळे आणि हातांवर असतो. शेफाली वीरूसारखीच बॉलकडे नजर ठेवत फलंदाजी करते. सेहवागप्रमाणेच शेफाली पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर दबाव ठेवते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या