पर्थ, 24 फेब्रुवारी : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नैतृत्वाखालच्या भारताच्या महिला संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. माजी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात 17 धावांनी पराभूत केल्यानंतर दुबळ्या बांग्लादेशवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ टॉस हरला, पण मैदानात पहिल्यांदा बॅटिंगची संधी मिळाल्याचा आपल्या खेळाडूंनी पुरेपुर फायदा उठवला. सहा खेळाडूंच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. यामध्ये शेफाली वर्माच्या 17 चेंडूतल्या तडाखेबाज 36 धावांचा समावेश आहे. यानंतर मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा संघ फक्त 124 धावा करू शकला, तर त्यांचे 8 खेळाडू बाद झाले. गोलंदाज पूनम यादवने चमकदार कामगिरी करत 3 विकेट घेतल्या. भारताच्या खेळाडू मैदानात उतरताच दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला लगेच धक्का बसला. तानिया भाटीया फक्त 2 धावा काढून बाद झाली. मधली काही षटकं फारच संथ गेली. पण शेफालीने एक बाजू लावून धरली. खेळायला मिळालेल्या अवघ्या 17 चेंडूत शेफालीने धमाल केली आणि चार उत्तुंग षटकार तर दोन खणकणीत चौकार लगावले. हरमनप्रीत कौर (8), ऋचा घोष (14) दीप्ती शर्मा ( 11) वेदा कृष्णमूर्ती ( 11 चेंडूत नाबाद 20) यांनी धावफलक सततत हलता ठेवला. शेफाली वर्मा च्या (39) आणि जेमिमा रॉड्रीग्ज (34) धावांमुळे पॉवर प्लेमध्ये भारतीय महिलांनी 54 धावा कुटल्या.
गटात टीम इंडीया अव्वल आधी माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेश अशा दोन्ही संघांना पराभवाची धूळ चारल्यामुळे भारतीय संघाची सुरुवात जोरात झाली आहे. आता टी-20 च्या विश्वचषकात आपल्या गटात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता भारताचा पुढचा सामना 27 फेब्रुवारीला होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.