मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ट्रम्प यांची भविष्यवाणी! IPL 2020 जिंकणाऱ्या संघाचे सांगितले नाव? मजेदार VIDEO VIRAL

ट्रम्प यांची भविष्यवाणी! IPL 2020 जिंकणाऱ्या संघाचे सांगितले नाव? मजेदार VIDEO VIRAL

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याला सुरूवात झाली. यावेळी आपल्या भाषणात क्रिकेटचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचे नाव घेतले.

  • Published by:  Priyanka Gawde

अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याला सुरूवात झाली. सोमवारी भारतात दाखल झाल्यानंतर अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थिती दर्शवली. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, भारताच्या संस्कृतीचेही कौतुकही केले. तसेच, आपल्या भाषणात ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र ट्रम्प यांनी सचिनच्या नावाचा सुचिन असा उल्लेख केला. मात्र ट्रम्प यांच्या भाषणानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ट्रम्प यांनी आयपीएलमध्ये कोणता संघ जिंकणार याचे संकेत दिले आहेत, असे म्हटलं जात आहे.

क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलेला आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. 50 दिवस आयपीएलचे हे हंगाम चालणार आहे. दरम्यान, 12 वर्षात एकदाही आयपीएल न जिंकलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये बंगळुरू संघाचे ट्रम्प कार्ड कोण आहे, असे विचारण्यात आल्यावर ट्रम्प यांनी विराट कोहलीचे नाव घेतले, असा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना बंगळुरू संघ यावर्षी आयपीएल जिंकणार असे कमेंट चाहत्यांनी केली आहे.

वाचा-LIVE Updates: ट्रम्प यांच्या भेटीचा दुसरा दिवस, 3 अब्ज डॉलर्सचा करार होणार

वाचा-मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन

वाचा-डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO

आरसीबीने आतापर्यंत 12 हंगामात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. 2009 आणि 2011 या दोन हंगामात आरसीबीचा संघ उपविजेतेपदावर राहिला. अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. तर, 2020साठी बंगळुरूने काही महत्त्वाच्या खेळाडूंना त्याच्या संघाचा भाग बनवले आहे. ज्यात अ‍ॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, वरुण चक्रवर्ती, केन रिचर्डसन, जोश फिलिप यांचा समावेश आहे.

RCBचा संघ- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत पड्डीकल, पार्थिव पटेल, अरॉन फिंच, जोशुआ फिलिपी, शाहबाद अहमद, गुरकीरत मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसरु उडाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन आणि डेल स्टेन.

First published:

Tags: Donald Trump, IPL 2020, RCB, Trump 2020