नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड कप दरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापत झाली, त्यामुळं त्याला न्यूझीलंड दौऱ्यात जागा मिळाली नाही. सध्या धवन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनरागमनची तयारी करत आहे. धवनं एक खास फोटो शेअर करत कमबॅकचे संकेत दिले आहेत. शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये धवन एका घोड्यावर बसलेला दिसत आहे. यावर त्यानं ‘कितने बॉलर थे? गब्बर इज बॅक’, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना आणि कोहलीला विशेष आनंद झाला असेल. वाचा- केएल राहुलला मिळाली संघात जागा, मालिका जिंकण्यासाठी घेतला मोठा निर्णय
वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी! 6 महिन्यांनंतर स्टार क्रिकेटपटू करणार कमबॅक वर्ल्ड कपनंतर धवन दुखापत ग्रस्त वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 117 धावांची खेळी करणारा धवन जखमी झाला होता. त्यानंतर त्याला पूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर दोन महिन्यांनंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पुनरागमन केले. वेस्ट इंडिज दौर्यावर वनडे मालिका खेळल्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान धवन जखमी झाला होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध टी -20 मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो खेळला. पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो तिसऱ्या वनडेमध्ये फलंदाजीस आला नाही. या दुखापतीमुळे धवन टीम इंडियासह न्यूझीलंड दौर्यावर जाऊ शकला नाही. पण आता तो मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. धवन हार्दिक पांड्यासोबत डीव्हाय पाटील टी-20 टुर्नामेंटमध्ये (DY Patil T20 Tournament) खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत 12 ते 8 मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यात धवन भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. वाचा- सचिनच्या सल्ल्यानंतर यशस्वीची आणखी एक शतकी खेळी, पण अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!