बंगळुरू, 20 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामन्यात भारतानं बाजी मारल 2-1ने मालिकाही आपल्या खिशात घातली. या सामन्यात रोहित शर्मानं 119 तर विराट कोहलीनं 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रोहितचे हे 29वे शतक असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले हे 8वे शतक आहे. मात्र शतकी खेळी केल्यानंतर रोहितला आयसीसी रॅकिंगमध्ये फायदा झाला नाही. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय रॅकिंगमध्ये विराट कोहली 886 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, 868 गुणांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी अटीतटीची लढाई सुरू आहे. दरम्यान या मालिकेत रोहितला पहिल्या सामन्यात विशेष चांगली कामगिरी केली नव्हती. तर, विराट सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फायदा विराटला झाला. वाचा- बाप असावा तर असा! संघाला सामना जिंकून दिल्यानंतर लेकीसोबत खेळताना दिसला रोहित रोहित आणि विराट वगळता इतर एकही भारतीय फलंदाज सध्या पहिल्या 10 खेळाडूंमध्ये नाही आहे. तर, गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा दहाव्या क्रमांकावर आहे. वाचा- रक्तबंबाळ होऊन कुंबळे खेळला क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी केला उल्लेख
🔸 Warner swaps places with Williamson
— ICC (@ICC) January 20, 2020
🔸 Aaron Finch enters top 10
After the #INDvAUS series, Australia openers make gains in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Rankings for batting.
Full rankings: https://t.co/tHR5rKl2SH pic.twitter.com/vZRRev7Upy
वाचा- क्रिकेट खेळताना भांडण टोकाला, पोटात बुक्की मारल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू सर्वात जलद पार केला 9 हजारांचा टप्पा एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने 9 हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा जगातील तिसरा वेगवान खेळाडू आहे. हा आकडा गाठण्यासाठी रोहितने 217 सामने खेळले. याआधी विराटनं 194 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळं सर्वात वेगवान 9 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ एबी डिव्हिलियर्सने 208 डावांमध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरूवात अत्यंत संथ शैलीने केली होती. रोहितने 82 डावांमध्ये 2000 वनडे धावा पूर्ण केल्या. 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात कमी गतीनं धावा करणारा भारतीय खेळाडू होता. यानंतर रोहित शर्माने धावांची भागीदारी केली आणि पुढच्या 7 हजार धावा खूप वेगात केल्या.

)







