मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्रिकेट खेळताना भांडण गेलं टोकाला, पोटात बुक्की मारल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना भांडण गेलं टोकाला, पोटात बुक्की मारल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना झाला वाद आणि 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.

क्रिकेट खेळताना झाला वाद आणि 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.

क्रिकेट खेळताना झाला वाद आणि 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.

    मल्हारा (मध्य प्रदेश), 20 जानेवारी : क्रिकेट हा अनिश्चित खेळ. या खेळात काय होईल काही सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये जेवढा रोमांच असतो तेवढा वादही. याच वादातून एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश येथील मल्हारा गढी पोलीस स्थानक परिसरातील खोंप या गावात क्रिकेटवरून झालेल्या वादात एका मुलाची हत्या करण्यात आली. 10 वर्षीय बृजेश रकवार आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना एका लहानश्या गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद झाला आणि रागात ब्रिजेशच्या मित्रानं त्याच्या पोटात वार केला. हा सगळा बृजेशने घरी सांगितला. पोटात जखम झाल्यामुळे पाच-सहा दिवस ब्रिजेश खातपित नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी ब्रिजेशला अचानक उलट्या सुरू झाल्या, त्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. वाचा-मनसेच्या महाअधिवेशानाआधी मोठा धमाका होणार? नेत्याने घातली शिवसैनिकांना साद मात्र जिल्हा रुग्णालयातच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बृजेशच्या घरच्यांनी गढी मल्हारा पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस बृजेशवर वार करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहे. वाचा-गुन्ह्याला माफी नाही! एअर इंडियाचा कॅप्टन झाला Instructor व्हॉईड बॉल टाकला म्हणून डोक्यात घातली बॅट एका गोलंदाजानं व्हाईड बॉल टाकला म्हणून फलंदाजानं डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सुजानगंज येथील बलहामाऊ गावात घडली. फलंदाजावर सध्या भा.द.वि. 304 अ (निष्काळजीपणाने हत्या करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या गुन्हागाराला अटक करण्यात आलेली नाही. बलहामाऊ येथे गावातील तरुण मिळून क्रिकेट खेळत असताना दोन गटांमध्ये वाद झाल. दरम्यान यावेळी गोलंदाज रजनीश पांडे (24) यानं गोलंदाजी केली. यावर आरोपी फलंदाज अंबुज मिश्रानं हा व्हाईड बॉल असल्याचे सांगितले तर रजनीशनं चेंडू वैध असल्याचे सांगत या दोघांमध्ये वाद झाला. या एका गोष्टीवरून दोघांमधील वाद टोकाला गेला आणि फलंदाज अंबुजने रजनीशच्या डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केली. यात रजनीश पांडे जागीच बेशुद्ध झाला. वाचा-आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या 2 बहिणींचा सापडला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या