मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens Asia Cup: पाकिस्तानचा राग बांगलादेशवर, आशिया कपमध्ये लेडी सेहवागनं केली 'ही' कमाल

Womens Asia Cup: पाकिस्तानचा राग बांगलादेशवर, आशिया कपमध्ये लेडी सेहवागनं केली 'ही' कमाल

शफाली वर्मा

शफाली वर्मा

Womens Asia Cup: बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ पॉईंट टेबलमध्ये 8 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सिल्हेत-बांगलादेश, 08 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कपममध्ये भारतीय संघाला काल पाकिस्ताननंकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यानंतर भारतीय संघानं आज जोरदार कमबॅक करताना बांगलादेशचा धुव्वा उडवला. शफाली वर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानं बांगलादेशविरुद्धचा हा सामना 59 रन्सनी जिंकला. या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण त्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 100 धावाच करता आल्या. या विजयासह स्पर्धेत पाच सामन्यात भारतीय महिला संघानं 4 विजयाची नोंद केली आहे.

पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल

बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ पॉईंट टेबलमध्ये 8 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आहेत. तर चौथ्या स्थानावर आहे बांगलादेश. साखळी फेरीतले अजून सहा सामने बाकी असून पॉईंट टेबलमध्ये अव्वल चार नंबरवर असणारे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत.

हेही वाचा - Ind vs SA ODI: दुसऱ्या वन डेसाठी रांचीत पोहोचली टीम इंडिया, अनोख्या पद्धतीन झालं स्वागत, Video

लेडी सेहवागचा दणका

भारतीय महिला संघाची सलामीवीर आणि लेडी सेहवाग अशी ओळख असलेली शफाली वर्मा भारताच्या या विजयाची प्रमुख नायक ठरली. तिनं आधी सलामीला येत शानदार अर्धशतक ठोकलं. शफालीनं 44 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्सर्ससह 55 धावा फटकावल्या. इतकच नव्हे तक कॅप्टन स्मृती मानधनासह पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. स्मृतीनंही 47 धावा केल्या्. तर फॉर्ममध्ये असलेल्या जेमिमा रॉड्रिग्सनं नाबाद 35 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 159 धावा करता आल्या.

बॅटिंगमध्ये कमाल दाखवलेल्या शफालीनं बॉलिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली. तीनं चार ओव्हरमध्ये फक्त 10 रन्स देताना दोन विकेट्सही घेतल्या. शफालीसह दिप्ती शर्मानं दोन तर रेणुका सिंग ठाकूरनं एक विकेट घेतली.

हेही वाचा - T20 World Cup: 'तो' नाही पण 'ती' मात्र पोहोचली ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले... 'आम्ही तुझ्या...'

शफालीच्या 1 हजार धावा

दरम्यान या सामन्यात भारताची लेडी सेहवाग शफाली वर्मानं एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. वयाच्या अठराव्या वर्षी शफालीनं ही कामगिरी बजावली आहे.

भारताचा शेवटचा सामना थायलंडशी

महिलांच्या आशिया कपमध्ये भारताचा अखेरचा साखळी सामना थायलंडविरुद्ध होणार आहे. सोमवारी दुपारी हा सामना खेळवण्यात येईल. हा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक कायम राखण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न राहील.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Team india, Women's cricket Asia Cup