मुंबई, 08 ऑक्टोबर: मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील वाका स्टेडियमवर भारतीय संघाचं पहिलं ट्रेनिंग सेशनही काल पार पडलं. पण भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये एका खेळाडूला चांगलाच मिस करतोय. तो आहे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा. पाठीच्या दुखापतीमुळे बुमरा यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे चुकलेली ही त्याची दुसरी मोठी स्पर्धा आहे. याआधी यूएईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेलाही त्याला मुकावं लागलं होतं. दरम्यानं बुमराचं ऑस्ट्रेलियाचं फ्लाईट जरी कॅन्सल झालं असलं तरी त्याची पत्नी संजया गणेशन मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे संजना गणेशन जसप्रीत बुमराची पत्नी संजना गणेशन ही एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी ती ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. संजनानं तिच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. यावेळी तिनं फ्लाईट मधला आपला फोटो पोस्ट केला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Heading to what’s quickly becoming my favourite hemisphere 🌏
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) October 7, 2022
.
.#T20WorldCup pic.twitter.com/iazVXUxPpI
संजनाच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया संजानानं फोटो पोस्ट करताच त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय… ‘आम्ही तुझ्या पतीला मिस करु…’ अशाच प्रकारे अन्य यूझर्सनीही त्यावर कमेंट केल्या आहेत. दरम्यान संजना आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेताना दिसणार आहे. आयसीसीकडून ती स्पोर्ट्स प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक आयसीसी टूर्नामेंटमध्ये संजना गणेशन स्पोर्ट्स प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसली होती.
हेही वाचा - T20 World Cup: महामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार? 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी बुमराऐवजी कुणाला संधी? दरम्यान टीम इंडिया 15 ऐवजी 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ऐनवेळेस जसप्रीत बुमराच्या दुखापतीनं उचल खाल्ली आणि वर्ल्ड कप मोहिमेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्याच्याशिवाय भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. बीसीसीआयनं लवकरच 15व्या खेळाडूची घोषणार करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर ही नावं चर्चेत आहेत.