रांची, 8 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरी वन डे उद्या रांचीत खेळवली जाणार आहे. त्यासाठी शिखर भारतीय संघ रांचीत दाखल झाला आहे. पहिल्या वन डे सामन्यात भारताला अवघ्या 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टेम्बा बवुमाचा दक्षिण आफ्रिकन संघ मालिकेत सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. रांचीतली दुसरी वन डे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. टीम इंडियाचं भव्य स्वागत दरम्यान रांचीत पोहोचताच भारतीय संघाचं भव्य स्वागत करण्यात आलं. रांची एअरपोर्टवरुन टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलसाठी रवाना झाले. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून यावेळी धवन आणि इतर खेळाडूंचं पारंपरिक पद्धतीनं वेलकम झालं. तर हॉटेलच्या बाहेर स्थानिकांच्या नृत्यातून आणि वादनातून झारखंडच्या पारंपरिक संस्कृतीचंही दर्शन झालं. बीसीसीआयनं याचा एक खास व्हिडीओ तयार करुन तो शेअर केला आहे. हेही वाचा - MS Dhoni: पांढरा टी-शर्ट, काळा मास्क… पाहा धोनीचा नवा अवतार, CSK ने शेअर केले फोटो रांचीच्या मैदानात टीम इंडियाचा विजय? टीम इंडियाचा महान कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं रांची हे होम ग्राऊंड. त्यामुळे धोनीच्या घरच्या मैदानात भारतीय संघ चांगली कामगिरी बजावणार अशी अपेक्षा आहे. खरं तर रांचीतल्या मैदात याआधीचं टीम इंडियाचं रेकॉर्ड साधारणच आहे. इथे झालेल्या 5 वन डे सामन्यांपैकी भारतानं 2 तर प्रतिस्पर्धी संघानं 2 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. दरम्यान टीम इंडियाचा युवा फलंदाज ईशान किशनचही हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याचा ईशानचा प्रयत्न राहील.
Touchdown Ranchi 📍#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/HCgIQ9pk0M
— BCCI (@BCCI) October 8, 2022
भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी वन डे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, रांची 9 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता स्टार स्पोर्ट आणि डिस्ने हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण भारत संभाव्य प्लेईंग इलेव्हन- शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, संजू सॅमसन (विकेट किपर), मोहम्मद सिराज, आवेश खान, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई