जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पहिल्या भेटीपासून ते लवकर झोपण्यापर्यंत, मॅक्सवेलच्या भारतीय गर्लफ्रेंडने सांगितल्या खासगी गोष्टी

पहिल्या भेटीपासून ते लवकर झोपण्यापर्यंत, मॅक्सवेलच्या भारतीय गर्लफ्रेंडने सांगितल्या खासगी गोष्टी

पहिल्या भेटीपासून ते लवकर झोपण्यापर्यंत, मॅक्सवेलच्या भारतीय गर्लफ्रेंडने सांगितल्या खासगी गोष्टी

मॅक्सवेलच्या भारतीय गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर सांगितली लव्ह स्टोरी.

  • -MIN READ
  • Last Updated :

सि़डनी, 11 एप्रिल : ऑस्ट्रेलियचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाच्या विनी रमनशी साखरपुडा केला होता. दोघेही बर्‍याच काळापासून एकमेकांना ओळखत होते आणि रिलेशनशिपमध्ये होते. सध्या लॉकडाऊनमध्ये दोघंही एकत्र वेळ घालवत आहेत. दरम्यान, विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल बरेच काही शेअर केले आहे. या पोस्टमध्ये विनीने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मॅक्सवेलनं भारतीय वंशाची विनी रमन हिच्याशी 26 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय पद्धतीने पुन्हा एकदा साखरपुडा केला. यावेळी मॅक्सवेळ शेरवाणी परिधान करून भारतीय अवतारात दिसला होता. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती. वाचा- चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, IPLचे आयोजन होणार; BCCIने तयार केला प्लॅन

जाहिरात

वाचा- VIDEO : शास्त्रींच्या कमेंट्रीचा पोलिसांकडून असाही वापर, लोकांना लावलं पळवून विनीने सांगितल्या खासगी गोष्टी विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिच्या आणि मॅक्सवेलबद्दल माहिती दिली. सात वर्षांपूर्वी बीबीएल टीम मेलबर्न स्टारच्या कार्यक्रमात ती मॅक्सवेलला पहिल्यांदा भेटली. दोघ 2018पासून एकमेकांना डेट करत आहेत. ग्लेनने पहिल्यांदा तिला प्रपोज केले होते, हेही तिने सांगितले. मॅक्सवेल विनीपेक्षा चार वर्ष पाच महिने मोठा आहे. तसेच विनीने हे उघड केले की ग्लेन तिच्यापेक्षा जास्त रागीट आणि हट्टी आहे. या पोस्टमध्ये एकच प्रश्न होता, ज्याचे उत्तर विनी देऊ शकली नाही. हा प्रश्न होता दोघांमध्ये जास्त जेवण कोण चांगल बनवतं. वाचा- गोल्फपटू नातवाने कोरोनाशी लढ्यात केलेल्या मदतीनंतर आजी रडली; म्हणाली…

वाचा- कोरोनाच्या लढ्यात पाकला अशी घ्यावी लागली जसप्रीत बुमराहची मदत मॅक्सवेलला डिप्रेशनमधून विनीने काढले होते बाहेर याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वाथ्यामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने, ‘माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझा मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरतर तिचे आभार मानले पाहिजेत”, असे सांगितले होते. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात